TRENDING:

डीजेच्या तीव्र आवाजानं घेतला पुण्यातील महिलेचा जीव? राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत घडली धक्कादायक घटना

Last Updated:

रंजना जाधव या घराबाहेर मिरवणूक पाहण्यासाठी आल्या होत्या. डीजेचा आवाज इतका प्रचंड होता की, त्यांच्या छातीत अचानक कळा येऊ लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ससाणेनगर परिसरात गुरुवारी रात्री राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे लावण्यात आला होता. या डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. रंजना रवींद्र जाधव (रा. ससाणेनगर) असे मृत महिलेचे नाव असून, त्या लष्कराच्या 'सीईमी' (CME) विभागातून निवृत्त झाल्या होत्या. डीजेच्या अति तीव्र आवाजाचा धक्का सहन न झाल्याने आईचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.
डीजेच्या तीव्र आवाजानं घेतला पुण्यातील महिलेचा जीव?
डीजेच्या तीव्र आवाजानं घेतला पुण्यातील महिलेचा जीव?
advertisement

काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ससाणेनगर मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात होती. रंजना जाधव या घराबाहेर मिरवणूक पाहण्यासाठी आल्या होत्या. डीजेचा आवाज इतका प्रचंड होता की, त्यांच्या छातीत अचानक कळा येऊ लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या. मिरवणुकीमुळे झालेली वाहतूक कोंडी आणि डीजेचा आवाज यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास मोठा विलंब झाला. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

advertisement

मृत महिलेचा मुलगा सौरभ जाधव यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी आवाजाच्या मर्यादेकडे दुर्लक्ष केले. वाहतूक कोंडीमुळे आईला वेळेत उपचार मिळाले नाहीत," असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. "महिलेची आधीच बायपास सर्जरी झाली होती आणि त्यांना डायलिसिस सुरू होते. डीजे बंद झाल्यानंतर ही घटना घडली असून आम्ही डीजेला परवानगी दिली नव्हती," असे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

ध्वनीप्रदूषणामुळे मानवी हृदयावर आणि श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या घटनेमुळे आता शहरातील मंडळांच्या आवाजाच्या मर्यादेवर पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
डीजेच्या तीव्र आवाजानं घेतला पुण्यातील महिलेचा जीव? राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत घडली धक्कादायक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल