TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, मार्चअखेर टेन्शन वाढलं, तिहेरी संकट, 72 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: मार्चअखेर महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत आहे. त्यातच उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रात वारं फिरलं, मार्चअखेर टेन्शन वाढलं, तिहेरी संकट, 72 तासांसाठी अलर्ट
महाराष्ट्रात मार्चअखेर उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचं संकट अधिक गडद होत असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी उष्णतेचा पारा चाळीशीच्या घरात असून बहुतांश भागात वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: कोकणात उष्ण आणि दमट हवामान तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट अशी स्थिती असेल. आज 28 मार्च रोजीचं महाराष्ट्रातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणात उष्णतेची लाट कायम असून हवामान विभागाने शुक्रवारी दमट हवामानासाठी यलो अलर्ट जारी केला होता. आज देखील मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील. कमाल तापमान 34-37 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणात 29 मार्चपासून उष्ण आणि दमट हवामानासोबत तुरळक पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह कोणत्याही जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता नाही. पुढील 2 दिवस हवामान कोरडे आणि उष्ण राहील. त्यानंतर मात्र पुन्हा अवकाळी संकटाचा धोका वाढेल. 30 मार्चपासून ताशी 40-50 किमी वारे आणि विजांसह गडगडाटी पाऊस होईल.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर भागावर अस्मानी संकटाचा धोका कायम आहे. शुक्रवारी संध्याकाळी कोल्हापूर परिसरात विजांसह पावसाने हजेरी लावली. आज, शनिवारी हवामान कोरडे राहील. तापमान 35-38 अंशांपर्यंत जाईल. परंतु, 2 दिवसांत वारं फिरणार असून पुन्हा अवकाळीचा धोका वाढेल. 30 मार्चपासून सर्वच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात आज उष्ण आणि कोरडे हवामान राहील. छत्रपती संभाजीनगरसह आज कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र, 24 तासांत हवापालट होणार असून रविवारपासून वादळी पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. ताशी 30-50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भात अवकाळी संकटाचा धोका कायम आहे. आज काही भागात हवामान कोरडे राहील. अकोला, अमरावती या जिल्ह्यांत पारा 40 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही भागात ताशी 30 ते 50 किमी वेगाच्या वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तर रविवारपासून पाऊस संपूर्ण विदर्भाला अवकाळी आणि गारपीटचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
7/7
महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे हवामान कायम असून पुढील 4 दिवसांत तापमानात फारसे बदल नाहीत. परंतु, मार्चअखेर अवकाळी संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, मार्चअखेर टेन्शन वाढलं, तिहेरी संकट, 72 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल