कामासाठी संघर्ष, 5 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर खचला अभिनेता; व्हिलन बनून सलमान खान, अजय देवगनला दिली टक्कर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Actor : एके काळी कामाच्या शोधात रस्त्यावर भटकणारा एक अभिनेता आता इंडस्ट्रीतील एक नावाजलेला स्टार बनला आहे.
advertisement
1/7

आज आपण जे काही कलाकार किंवा सेलिब्रिटी पाहत आहोत, त्यांच्या प्रत्येकाची काही ना काही स्टोरी आहे. कित्येक सेलिब्रिटी अगदी गरीब, हलाखीतून वर आलेले आहेत. त्यापैकी एक अभिनेता जो एकेकाळी कामाच्या शोधात रस्त्यावर भटकत होता. पण आज तो जो पडद्यावरील बड्या कलाकारांना कडवी टक्कर देत आहे.
advertisement
2/7
त्याचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. त्याने अनेक मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या आईला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पण याच कठीण परिस्थितीने त्याला अधिक कणखर बनवलं.
advertisement
3/7
2004 मध्ये त्याने त्याच्या 5 वर्षांच्या मुलाला कायमचं गमावलं. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ. या दु:खद घटनेने तो कोलमडला पण त्यातूनही त्याने स्वत:ला सावरलं आणि करिअरच्या दिशेने तो चालत राहिला.
advertisement
4/7
सिनेसृष्टीत त्याच्या कारकिर्दीची सुरुवात 1990 च्या दशकात कन्नड चित्रपटांमधून झाली, पण त्याला खरी ओळख तामिळ चित्रपटातून मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याने अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
5/7
बॉलिवूडमध्येही त्याने आपली एक महत्त्वपूर्ण ओळख निर्माण केली. सलमान खानच्या 'वॉन्टेड' आणि अजय देवगणच्या 'सिंघम' या चित्रपटांमधील धोकादायक खलनायकाच्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचा अभिनय इतका प्रभावी होता की त्याने हिरोलाही मागे टाकलं.
advertisement
6/7
आज तो फक्त उत्कृष्ट अभिनेताच नाही, तर आपल्या स्पष्टवक्त्या मतांसाठीही ओळखला जातो. तो अनेकदा राजकीय मुद्द्यांवर उघडपणे बोलतो. निर्भयपणे आपली मत मांडतो. यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोलही होतो.
advertisement
7/7
हा अभिनेता आहे प्रकाश राज. ज्यांना सुरुवातीला अगदी छोट्या भूमिका मिळवण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागला, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. आज ते इंडस्ट्रीतील सगळ्यात शक्तिशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. ज्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि प्रतिभेने दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कामासाठी संघर्ष, 5 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर खचला अभिनेता; व्हिलन बनून सलमान खान, अजय देवगनला दिली टक्कर