TRENDING:

Summer Drink : कैरीचं पन्हं बनवायला वेळ नाही? बनवा हे झटपट कैरीचं सरबत, याची चव तुमचं मन करेल तृप्त!

Last Updated:

दुपारच्यावेळी चहा न घेता तुम्ही हे सरबत बनवू शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी तर चांगलं आहेच, हे शरीराला गारवा देत आणि विशेष म्हणजे झटपट तयार होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळयात आपल्याकडे कैरीचं पन्ह बऱ्याचदा बनवलं जातं. पण पन्ह बनवण्यासाठी कैरी शिजवून घ्यावी लागते. यात खूप वेळ जातो. अशावेळी तुम्ही झटपट बनणारं हे कैरीचं सरबत एकदा करून पाहा. हे तुम्हाला नक्की आवडेल. हे सरबत बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि जास्त साहित्याचीही गरज नाही.
कैरीचं सरबत बनवण्याची सोपी पद्धत..
कैरीचं सरबत बनवण्याची सोपी पद्धत..
advertisement

दुपारच्यावेळी चहा न घेता तुम्ही हे सरबत बनवू शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी तर चांगलं आहेच, हे शरीराला गारवा देत आणि विशेष म्हणजे झटपट तयार होतं. ही रेसिपी aamhi_malvani_15 या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली गेली आहे.

कैरीचं सरबत बनवण्यासाठी लागणारं साहित्य..

- कैरी

- पुदिना

- जिरं

- बर्फाचे तुकडे

- पाणी

advertisement

- साखर

- वेलची पूड

कैरीचं सरबत बनवण्याची सोपी पद्धत..

- सर्वात आधी कैऱ्या व्यवस्थित धुवून घ्या.

- त्यानंतर कैरीची साल आणि गुठळ्या काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.

- आता एक मिक्सरचं भांडं घ्या. त्यामध्ये कैरीचे तुकडे टाका.

- या कैरीमध्ये पुदिना आणि जिरं टाकून व्यवस्थित बारीक करून घ्या.

advertisement

- त्यानंतर हे मिश्रण एका सुती कापडातून गाळून घ्या.

- असं केल्याने याचं पाणी वेगळं होईल आणि चोथा वेगळा होईल.

- आता या कैरीच्या पाण्यामध्ये आणखी थोडं पाणी टाका.

- त्यानंतर यामध्ये साखर आणि वेलची पूड टाकून मिक्स करा. आता हे सरबत तयार आहे.

हे सरबत सर्व्ह करण्यासाठी काचेच्या ग्लासच्या काठांना तिखट आणि लावा. आता यामध्ये काही बर्फाचे तुकडे टाका आणि हे सरबत टाका.अशाप्रकारे थंडगार सरबत तयार होईल. हे सरबत एकदा नक्की बनवून पाहा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Drink : कैरीचं पन्हं बनवायला वेळ नाही? बनवा हे झटपट कैरीचं सरबत, याची चव तुमचं मन करेल तृप्त!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल