TRENDING:

Aajache Rashibhavishya: मेष, मिथुन अन् मीन राशींसाठी गेमचेंजर दिवस, शुक्रवारी तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा शुक्रवार कसा असेल? ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
मेष, मिथुन अन् मीन राशींसाठी गेमचेंजर दिवस, शुक्रवारी तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य
मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत काही निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या. तज्ञांचा सल्ला घेतल्यास उत्तम. कामाच्या ठिकाणी मित्राचे सहकार्य मिळेल. कुटुंबामध्ये समाधानकारक वातावरण असेल.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. कामाचा अति ताण तुम्हाला जाणवेल. कामामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःला वेळ द्या. एखाद्या कामात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ कार्यात सहभागी होणार आहात.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असणार आहे. आज धनलाभाची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. परंतु तुम्ही फोकसने काम केलेत तर त्यावर नक्कीच मात करू शकता. कुटुंबातील सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ योग घेऊन येत आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. अनेक सकारात्मक बदल पहायला मिळतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज मन अस्थिर असल्यामुळे कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित होणार नाही. कामे प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. या सगळ्यांमुळे तुमची चिडचिड होऊ शकते. विनाकारण राग कोणावरही निघेल. त्यामुळे संयमाने वागा.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामे पूर्ण होतील. त्यामुळे स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. अनावश्यक खर्च देखील होण्याची शक्यता आहे. एकूणच आजचा दिवस तुमचा समाधानकारक असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशीसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. गुरू ग्रहाच्या शुभ स्थितीमुळे गुरुजनांप्रती श्रद्धा आणि निष्ठा अधिक वाढेल. तुम्हाला काही अडचणी असतील तर त्यावर मार्ग नक्कीच मिळेल. नवीन कामात गुंतवणूक करावी लागली तर नक्की करा. परंतु तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास उत्तम. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. परंतु कामाचा ताण जाणवू शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. काही लोक तुमच्याविरोधात बोलू शकतात, पण तुमचे कामच उत्तर देईल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस अनेक शुभ योग घेऊन येत आहे. तुम्ही ज्या गोष्टीची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. त्या गोष्टी आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
10/13
मकर राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी दिवस योग्य आहे, भविष्यात लाभाचे संकेत आहेत. परंतु पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या. घरातील वातावरण आनंदी राहील. काही लोकांकडून प्रशंसा मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.
advertisement
11/13
आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असेल. कामात अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही चिकाटी ठेवल्यास यश नक्कीच मिळेल. आरोग्याच्या बाबतीत झोपेची कमतरता त्रास देऊ शकते. जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघाताची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा.
advertisement
12/13
मीन राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. चतुर्थ स्थानात मिथुन राशीतील गुरू असल्यामुळे मुलांसोबत काही वाद असतील तर ते कमी होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या कामामुळे मान सन्मान मिळेल.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: मेष, मिथुन अन् मीन राशींसाठी गेमचेंजर दिवस, शुक्रवारी तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल