TRENDING:

मध्यरात्री हंडे घेऊन रस्त्यावर फिरताना दिसल्या तिघी; सीसीटीव्हीत पुण्यातील महिलांचं ते कांड पाहून पोलीसही हादरले, 'लेडी गँग'ला बेड्या

Last Updated:

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद महिला हंडे घेऊन जाताना दिसून आल्या

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्यातून सतत चोरीच्या काही ना काही घटना समोर येत आहेत. चोरीच्या घटनांमध्ये आता महिलांच्या टोळ्याही मागे नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जुन्नरमधील एका भांडी विक्रेत्याच्या गोडाऊनमधून चक्क २ लाख रुपये किमतीचे ९० तांब्याचे हंडे चोरी गेले होते. हे हंडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील तिन्ही महिलांना पोलिसांनी शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद महिला हंडे घेऊन जाताना दिसून आल्या (प्रतिकात्मक फोटो)
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद महिला हंडे घेऊन जाताना दिसून आल्या (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

प्रकरण काय?

जुन्नरमधील महाजन आळीत राहणारे आनंद सासवडे यांचा भांड्याचा मोठा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तांब्याचे हंडे लंपास केले होते. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सासवडे यांनी पोलिसांत धाव घेतली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी इतर महागड्या वस्तू सोडून केवळ तांब्याच्या हंड्यांवर हात साफ केल्याने ही एक विचित्र चोरी ठरली होती.

advertisement

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद महिला हंडे घेऊन जाताना दिसून आल्या. सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, जुन्नरमधील पंचलिंग वस्ती येथील सारिका मकवाने, अंजली वाघमारे आणि सुरेखा वालेकर या महिलांनीच हा प्रताप केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

पोलिसांनी कुरण फाटा येथे सापळा रचून या तिघींना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या ९० पैकी ५५ हंडे हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, घरफोड्यांमध्ये महिलांच्या वाढत्या सहभागामुळे नागरिक अवाक झाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मध्यरात्री हंडे घेऊन रस्त्यावर फिरताना दिसल्या तिघी; सीसीटीव्हीत पुण्यातील महिलांचं ते कांड पाहून पोलीसही हादरले, 'लेडी गँग'ला बेड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल