Weather Alert: तयार राहा! महाराष्ट्रावर येतंय मोठं संकट, 24 तासांत काळे ढग, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: मार्चअखेर संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी संकटाचा धोका वाढणार आहे. हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध भागांत अस्मानी संकटानं सर्वांनाच हैराण केलं आहे. आता मार्चअखेर धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. 29 मार्च रोजीचं हवामान आमि तापमान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
महाराष्ट्रात आज कोरडे ते अंशत: ढगाळ हवामान राहील. काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यांची शक्यता आहे. कमाल तापमान 31 ते 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 28 अंशांच्या दरम्यान राहील. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर, तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा यलो अलर्ट असेल.
advertisement
3/7
कोकणात आज उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल तापमान 31.32 अंशांच्या दरम्यान राहील. तर कोकणातील काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता आहे. येत्या 2 दिवसांत अवकाळीची तीव्रता वाढणार असून दक्षिण कोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रात आज वादळापूर्वीची शांतता असल्याची स्थिती असेल. आज सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट असेल. तर इतर भागात देखील तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, सोमवारपासून अवकाळीचा धोका वाढण्याचा अंदाज आहे. ताशी 40-50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह अस्मानी संकट बहुतांश भागांना झोडपून काढेल.
advertisement
5/7
मराठवाड्यात तापमानाचा पारा 34-37 अंशांवर आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. परंतु, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असून यलो अलर्ट कायम आहे. 30 मार्चपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सक्रीय होत असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
6/7
विदर्भाचा पारा पुन्हा चढत आहे. आज कमाल तापमान 36-39 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे राहील. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रात्रीचे तापमानही जास्त राहील. येत्या दोन दिवसांत संपूर्ण विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट घोंघावणार आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, महाराष्ट्रात आज वादळापूर्वीची शांतता असल्याची स्थिती असेल. 4 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट असून इतर ठिकाणी हलका पाऊस आणि उन्हाचे चटके जाणवतील. सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सक्रीय होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: तयार राहा! महाराष्ट्रावर येतंय मोठं संकट, 24 तासांत काळे ढग, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट