स्पीड ब्रेकरवर कार अडकल्यानंतर हार्दिक कारच्या खालचा भाग खराब होऊ नये म्हणून हार्दिकने प्रयत्न केले. स्पीड ब्रेकरवरून कार सरळ नेण्याऐवजी हार्दिकने तिरकी केली आणि अत्यंत सावध पद्धतीने स्पीड ब्रेकर पार केला.
पोलीस अधिकाऱ्यांची भेट
स्पीड ब्रेकर पार केल्यानंतर हार्दिक पांड्याने तिथे उपस्थित असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंबईच्या रस्त्यांवर एवढी महागडी आणि दुर्लभ कार पाहून पोलीसही बघत बसले आणि त्यांनी हार्दिकचं स्वागत केलं. हार्दिक पांड्याच्या या व्हिडिओवर चाहते मजेशीर कमेंट करत आहे.
सहाव्या ट्रॉफीसाठी मुंबई मैदानात
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 च्या त्यांच्या मिशनला सुरूवात करत आहे. पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर केकेआरविरुद्ध होत आहे. मागच्या 5 वर्षांपासून मुंबईला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मागच्या मोसमात मुंबईची टीम क्वालिफायर-2 पर्यंत पोहोचली होती. मुंबईकडे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या एवढेच वर्ल्ड कप विजेते चॅम्पियन आहेत, त्यामुळे सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई प्रबळ दावेदार मानली जात आहे.
