अशोक खरातचं शातीर डोकं, डेटा असून पुरावे सापडेना, माहिती लपवण्यासाठी खास ट्रीक? SIT चा कोर्टात दावा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम व्ही भराडे यांनी खरातची 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे.
advertisement
1/7

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम व्ही भराडे यांनी खरातची 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे.
advertisement
2/7
अशोक खरात मागील दहा दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. मात्र तो तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती एसआयटीने कोर्टात दिली आहे. शिवाय आता अशोक खरातबाबत अत्यंत संवेदनशील माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
3/7
अशोक खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाला असून त्याचा तपास बाकी आहे. यात विविध राजकीय व्यक्तींची नावं त्याने कोडवर्ड किंवा दुसऱ्या नावानं सेव्ह केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांकडे डेटा असूनही माहिती मिळत नसल्याचं बोललं जात आहे.
advertisement
4/7
पोलिसांपासून माहिती लपवण्यासाठी अशोक खरातने बनावट नावाने हा डेटा लपवल्याचा पोलिसांना संशय आहे. या डेटाचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं.
advertisement
5/7
यानंतर कोर्टाने खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याला १ एप्रिलला कोर्टात हजर करावं लागणार आहे.
advertisement
6/7
फॉरेन्सिक टीमकडून आजच मोबाईल आणि लॅपटॉप प्राप्त झाला, असंही तपासी अधिकाऱ्यांनी कोर्टात माहिती दिली.
advertisement
7/7
दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपी विरोधात असलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
अशोक खरातचं शातीर डोकं, डेटा असून पुरावे सापडेना, माहिती लपवण्यासाठी खास ट्रीक? SIT चा कोर्टात दावा