Ayurvedic Remedy : शरीरात कोलेस्टेरॉल वाढलंय! आजपासून खायला सुरु करा 'हे' पदार्थ, कमी होईल त्रास
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. म्हणूनच ते वेळीच कमी करणं गरजेचं असतं. काही पदार्थ खाल्ल्याने तुमचे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होईल.
advertisement
1/9

हल्ली आपल्या जीवनशैलीमध्ये खूप बदल झाले आहेत. बहुतेक लोकांचं काम बसून असतं. विशेषतः शहरातील लोकांचं काम बसून असतं. पण अशा बसून काम केल्यामुळे आरोग्यावर याचा परिणाम होतोच. शारीरिक हालचाल नसल्याने वजन वाढण्याच्या समस्येसोबत कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्याही होऊ शकते.
advertisement
2/9
या समस्येसाठी डॉक्टर्स औषधं देतात. पण तुमचे कोलेस्टेरॉल वाढण्यास सुरुवात झाली असेल आणि तुम्हाला औषधांवर अवलंबून राहायचं नसेल तर आयुर्वेदामध्ये यासाठी काही सोपे उपाय दिलेले आहेत. तुम्ही काही पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होईल.
advertisement
3/9
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. म्हणूनच ते वेळीच कमी करणं गरजेचं असतं. शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं आहे हे आपल्याला काही लक्षणांद्वारे ओळखता येऊ शकतं. पापण्यांवर किंवा शरीरावर डाग, छातीत दुखणे किंवा जडपणा, श्वास घ्यायला त्रास, लवकर थकणं, पायांना पेटके येणं अशा समस्या वाढलेलं कोलेस्टेरॉल दाखवतात.
advertisement
4/9
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज दिवसाच्या सुरुवातीला मेथी आणि लसणाचं पाणी प्या. मेथीचे दाणे आई लसणाची एका पाकळी रात्रभर पाण्यात टाकून भिजवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि नवे कोलेस्ट्रॉल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. पाणी प्यायचं नसेल तर तुम्ही हलका भाजलेला लसूणही खाऊ शकता.
advertisement
5/9
सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स आणि जवस खा. कारण ओट्समध्ये असणारं बीटा-ग्लुकन आणि जवसातील ओमेगा-3 आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर हे खराब कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी आणि हृदयावरील दाब कमी करण्यासाठीही मदत करतात.
advertisement
6/9
आहारात डाळी आणि राजमा सामील करा. राजमा आणि डाळींमध्ये फायबरसोबत प्लांट प्रोटीन असतात, हे कोलेस्ट्रॉलचं शोषण रोखून ते कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदय मजबूत करतात आणि शरीराची कार्यक्षमताही सुधारतात.
advertisement
7/9
कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर हे सर्व पदार्थ खाण्यासोबत काही पदार्थ खाणं टाळवंही लागेल. म्हणून शक्यतो आहारात रिफाइन्ड तेलाचा वापर टाळा. कारण हे हाय कोलेस्ट्रॉल वाढवतं. रिफाइन्ड तेलाऐवजी तुम्ही मोहरी, तीळ किंवा ऑलिव्ह तेल वापरू शकता.
advertisement
8/9
काही पदार्थ खाण्यासोबत तुम्ही नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. म्हणून रोज हलका व्यायाम करा, योगा करा. चालणं, चालणे, सायकलिंग आणि स्ट्रेचिंग यांचाही तुमच्या दिनचर्येत समावेश करा.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ayurvedic Remedy : शरीरात कोलेस्टेरॉल वाढलंय! आजपासून खायला सुरु करा 'हे' पदार्थ, कमी होईल त्रास