TRENDING:

Ayesha Takia Birthday: सर्जरीमुळे अभिनेत्रीची वाईट अवस्था, ट्रोलिंगनंतर झाली गायब, आता काय करतेय आयशा टाकिया?

Last Updated:
Ayesha Takia Birthday:बॉलीवूड अभिनेत्री आयशा टाकियाचा 10 एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा ती 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सर्जरी केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सध्या काय करतेय?
advertisement
1/7
सर्जरीमुळे अभिनेत्रीची वाईट अवस्था, ट्रोलिंगनंतर झाली गायब, आता काय करतेय आयशा?
बॉलीवूड अभिनेत्री आयशा टाकियाचा 10 एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा ती 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सर्जरी केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सध्या काय करतेय? आणि तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
2/7
'टार्झन: द वंडर कार' आणि 'वाँटेड' यांसारख्या चित्रपटांतून लोकप्रिय झालेली आयशा काही काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर तिची उपस्थिती कायम चर्चेत असते.
advertisement
3/7
2004 मध्ये ‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटातून आयशाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तिच्या मासूम चेहऱ्याने आणि सहज अभिनयाने ती लवकरच चाहत्यांची लाडकी बनली.
advertisement
4/7
'सोचा ना था', 'दिल मांगे मोर', 'शादी से पहले', 'नो स्मोकिंग', 'पाठशाला', 'वाँटेड' हे तिचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. करिअरच्या उंचीवर असतानाच आयशाने 23 व्या वर्षी फरहान आझमीशी लग्न केलं.
advertisement
5/7
फरहान हे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र आहेत आणि व्यवसायाने हॉटेल व्यवसायात आहेत. लग्नानंतर आयशाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि सिनेसृष्टीपासून थोडं अंतर ठेवायला सुरुवात केली. सध्या ती एका मुलाची आई असून कौटुंबिक आयुष्य आणि सामाजिक कामांकडे लक्ष देत आहे.
advertisement
6/7
काही वर्षांपूर्वी आयशाने प्लास्टिक सर्जरी केल्याचं समोर आलं आणि तिचा चेहरा पूर्णपणे बदलल्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. तिला ओळखणंही कठीण झालं होतं.
advertisement
7/7
ट्रोलिंगमुळे ती काही काळ सोशल मीडियावरून गायब झाली होती. मात्र नंतर तिने पुन्हा इंस्टाग्रामवर सक्रिय होऊन आपले फोटो, विचार आणि आयुष्यातील खास क्षण शेअर करायला सुरुवात केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ayesha Takia Birthday: सर्जरीमुळे अभिनेत्रीची वाईट अवस्था, ट्रोलिंगनंतर झाली गायब, आता काय करतेय आयशा टाकिया?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल