TRENDING:

Tandoor Chai : 'तंदूरी चहा' घरी कसा बनवायचा? टेन्शन नॉट, ही घ्या सोप्पी ट्रीक हॉटेलसारखीच येईल चव

Last Updated:
तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या कोळशाचा (Charcoal) वापर करून तुम्ही अगदी 5 मिनिटांत हॉटेलसारखा तंदूरी चहा बनवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.
advertisement
1/10
तंदूरी चहा घरी कसा बनवायचा? टेन्शन नॉट, ही घ्या सोप्पी ट्रीक हॉटेलसारखीच येईल चव
पाऊस पडत असो किंवा थंडीची गुलाबी सकाळ, वाफाळलेला चहा समोर आला की मन कसं प्रसन्न होतं. त्यातही जर चहा 'तंदूरी' असेल, तर त्याची बातच काही वेगळी. मातीच्या सुगंधाचा आणि कोळशाच्या धुराचा तो 'स्मोकी' स्वाद चहाची चव कैक पटीने वाढवतो.
advertisement
2/10
अनेकांना वाटतं की तंदूरी चहा फक्त बाहेरच मिळतो कारण त्यासाठी मोठं तंदूर लागतं. पण, तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या कोळशाचा (Charcoal) वापर करून तुम्ही अगदी 5 मिनिटांत हॉटेलसारखा तंदूरी चहा बनवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.
advertisement
3/10
पाणी: 1 कपदूध: 1.2 कपचहापत्ती: 2 मोठे चमचेसाखर: चवीनुसार (2 चमचे)मसाले: आल्याचा तुकडा, 2-3 वेलची, थोडी दालचिनीमुख्य साहित्य: 1 कोळशाचा तुकडा आणि 1 मातीचे छोटे भांडे (कुलहड)कृती: टप्प्याटप्प्याने समजून घ्या
advertisement
4/10
1. चहा उकळायला ठेवासर्वात आधी एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात किसलेलं आलं, ठेचलेली वेलची आणि दालचिनी टाका. पाण्याला उकळी आली की चहापत्ती आणि साखर घालून 2 मिनिटे छान उकळू द्या. आता त्यात दूध घाला आणि चहा चांगला कडू द्या. (तंदूरी चहासाठी चहा थोडा घट्ट आणि स्ट्रॉंग असेल तर जास्त छान लागतो).
advertisement
5/10
2. कोळसा गरम कराचहा उकळत असतानाच, गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर कोळशाचा एक मोठा तुकडा चिमट्याने धरून थेट आचेवर गरम करायला ठेवा. कोळसा जोपर्यंत लालबुंद (Red Hot) होत नाही, तोपर्यंत तो गरम करा.
advertisement
6/10
3. मातीचे भांडं (कुलहड) तापवाकोळसा गरम झाल्यावर, ते मातीचे भांडे (कुलहड) गॅसवर ठेवा आणि ते सर्व बाजूंनी चांगले तापवून घ्या. भांड्यातून मातीचा खरपूस सुगंध येणे गरजेचे आहे.
advertisement
7/10
4. खरी जादू: तंदूरी तडकाआता एक खोलगट स्टीलचं मोठं पातेलं घ्या. त्या पातेल्याच्या मध्यभागी गरम केलेलं मातीचं भांडं (कुलहड) ठेवा. आता त्या गरम कुलहडमध्ये लाल झालेला कोळसा टाका आणि त्यावर अगदी अर्धा चमचा तूप किंवा लोणी सोडा. त्यातून लगेच धूर निघू लागेल.
advertisement
8/10
5. चहा गाळून घ्यात्वरीत तयार केलेला गरम चहा गाळणीने त्या मातीच्या भांड्यात (ज्यात कोळसा आहे) ओता. चहा ओतताच तो फसफसून बाहेर येईल आणि भांड्यातील धूर आणि मातीचा सुगंध चहात पूर्णपणे मिसळला जाईल. हे दृश्य अगदी एखाद्या कॅफेसारखं दिसतं.
advertisement
9/10
जर तुम्हाला कोळसा थेट चहात टाकायचा नसेल, तर गरम कुलहडमध्ये चहा ओता आणि मग ते कुलहड धूर निघणाऱ्या कोळशाच्या वर २ मिनिटे झाकून ठेवा. यानेही चहाला छान स्मोकी चव येईल.
advertisement
10/10
तुमचा गरमागरम होममेड तंदूरी चहा तयार आहे. हा चहा बिस्किटं किंवा वाफाळलेल्या भजीसोबत सर्व्ह करा. हा स्मोकी चहा पिऊन तुमच्या घरचे लोक नक्कीच विचारतील, "अरे, हे बाहेरून मागवलंय का?"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tandoor Chai : 'तंदूरी चहा' घरी कसा बनवायचा? टेन्शन नॉट, ही घ्या सोप्पी ट्रीक हॉटेलसारखीच येईल चव
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल