Bigg Boss Marathi 6 : RB शी राडा विशालला महागात पडला! 'भाऊचा धक्का'वर रितेशने दिला 'कडक धक्का'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 च्या घरात विशाल आणि राकेश यांच्या राड्यावर बिग बॉसने तर शिक्षा सुनावली पण रितेश यावर काय निर्णय देणार हेच सगळ्यांना पाहायचं होतं.
advertisement
1/7

या आठवड्यात बिग बॉस मराठी 6 च्या भाऊचा धक्काची प्रतीक्षा जरा जास्तच होती. याचं कारण म्हणजे विशाल कोटियन आणि राकेश बापट यांच्यात झालेला राडा. जो चांगलाच गाजला. अजूनही हा मुद्दा तापलेलाच आहे.
advertisement
2/7
नॉमिनेशनवेळी विशाल आणि राकेश यांच्यात हाणामारी झाली. विशाल आपल्या आणि इतरांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतो असं म्हणत आरबीने त्याला नॉमिनेट केलं. यावर विशाल भडकला आणि त्याने राकेशही आपल्या वयावर बोलतो असं म्हणत त्याच्या घटस्फोटाचा मुद्दा उकरून काढला. यामुळे राकेशही संतप्त झाला.
advertisement
3/7
यानंतर दोघांमधील वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. घरातील सदस्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यातील आक्रमकता पाहून शेवटी बिग बॉसने मध्यस्थी केली आणि राकेशला या आठवड्यासाठी तर विशालला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलं.
advertisement
4/7
यानंतर बापट कुटुंबाने विशालने नियमांचा भंग केल्याचं म्हणत त्याच्याविरोधात कडक कारवाईची मागणी करणारं प्रसिद्धीपत्रक जारी केलं. तसंच सोशल मीडियावरही विशालविरोधात सूर उमटू लागले. बहुतेकांनी राकेशला पाठिंबा देत विशालला घराबाहेर काढण्याची मागणी केली.
advertisement
5/7
यानंतर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं ते भाऊचा धक्का आणि रितेश देशमुखकडे. रितेश यावर काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. अखेर भाऊचा धक्काचा तो प्रोमो समोर आला आहे.
advertisement
6/7
राकेश आणि विशाल यांच्या राड्याचा मुद्दा रितेशने भाऊचा धक्कावर उपस्थित केला. रितेश विशालला सुनावताना दिसतो आहे. तो म्हणतो, विशाल तुम्ही राकेश यांना धक्का नाही मारलात तुम्ही जी जिंकण्याची ट्रॉफी आहे तिला धक्का मारलात. तुम्हाला थेट सांगतो महाराष्ट्राला हे आवडलेलं नाही. हे खपवून घेतलं जाणार नाही"
advertisement
7/7
रितेशने विशालची चांगलीच शाळा घेतली आहे. पण नेमकी आता त्याला काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : RB शी राडा विशालला महागात पडला! 'भाऊचा धक्का'वर रितेशने दिला 'कडक धक्का'