पबमध्ये दारू पिऊन धिंगाणा, बॉलिवूडच्या सुपरस्टार सिंगरच्या लेकाला तरुणीने मारली थप्पड! कोण आहे तो?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Controversies : प्रसिद्ध गायकाचा मुलगा आपल्या वादग्रस्त वागण्यामुळे चर्चेत असतो. त्याला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे. आज तो आपला वाढदिवस साजरा करत आहे.
advertisement
1/6

मुंबई : प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. एक उत्कृष्ट गायक आणि होस्ट म्हणून त्याची ओळख आहे. पण त्याच्या करिअरमध्ये तो कधीच त्याच्या वडिलांसारखं नाव कमवू शकला नाही.
advertisement
2/6
त्याला अनेकदा त्याच्या बेजबाबदार आणि वादग्रस्त वागण्यामुळे टीकेचा सामना करावा लागला आहे. कॉन्सर्टमध्ये चाहत्यांचा मोबाईल फेकण्यापासून ते एअरलाईन कर्मचाऱ्याला धमकी देण्यापर्यंत, अनेक वेळा तो त्याच्या वागण्यामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
3/6
२०११ मध्ये आदित्य नारायण एका पबमध्ये होता. तिथे त्याने त्याच्या मित्रांसोबत खूप दारू प्यायली. तो पूर्णपणे नशेत होता. याचवेळी त्याने एका तरुणीवर काहीतरी आक्षेपार्ह कमेंट केली. त्याचं गैरवर्तन आणि आक्षेपार्ह कमेंट त्या तरुणीला अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्या तरुणीने त्याला जोरदार थप्पड मारली होती, असं बोललं जातं.
advertisement
4/6
या घटनेमुळे आदित्य नारायणला खूप अपमानास्पद वाटलं होतं. त्याने या घटनेनंतर तरुणीने थप्पड मारल्याचं मान्य केलं नाही, पण त्याने आपल्या मित्रांसोबत पबमध्ये वाद झाल्याचं मान्य केलं होतं.
advertisement
5/6
२०१७ मध्येही आदित्य नारायण पुन्हा एकदा चर्चेत आला होता. यावेळी त्याने रायपूरच्या एअरपोर्टवर एअरलाईन कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप होता. झालं असं होतं की, त्याच्यासोबत ४० किलोपेक्षा जास्त बॅगेज होतं आणि त्यासाठी एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे १३ हजार रुपये अतिरिक्त शुल्क मागितले.
advertisement
6/6
पण आदित्यने पैसे देण्यास नकार दिला, आणि त्याने कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला. त्याने कर्मचाऱ्याला धमकी देखील दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याशिवाय, आदित्य नारायणच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे त्याला त्याच्या वागण्यामुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पबमध्ये दारू पिऊन धिंगाणा, बॉलिवूडच्या सुपरस्टार सिंगरच्या लेकाला तरुणीने मारली थप्पड! कोण आहे तो?