TRENDING:

बॉलिवूडचा सुपरस्टार ज्याच्यावर लाखो हसीना फिदा; पण त्याने 16 वर्षांच्या मुलीसोबत थाटला संसार

Last Updated:
Bollywood Superstar Married 15 Year Old Girl : बॉलिवूडचा हा सुपरस्टार फक्त त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे.
advertisement
1/5
बॉलिवूडचा सुपरस्टार, लाखो हसीना फिदा, पण त्याने 16 वर्षीय मुलीसोबत थाटला संसार
बॉलिवूडचा हा सुपरस्टार ज्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1966 मध्ये सुरू केली. करिअरच्या सुरुवातीच्या वर्षातच तो खूप यशस्वी झाला. 1975 पर्यंत चाललेला त्याचा बॉलिवूड प्रवास सर्वात प्रसिद्ध होता. त्याच्या चित्रपटांमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळालीच पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यानेही लक्षणीय लक्ष वेधलं.
advertisement
2/5
29 डिसेंबर 1942 रोजी पंजाबमधील अमृतसर इथं त्यांचा जन्म झाला. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला तो सुपरस्टार बनला. कारकिर्दीच्या शिखरावर असताना 1973 साली वयाच्या 31 व्या वर्षी  त्याने लग्न केलं. त्याच्या वयाच्या अर्ध्या वयाच्या मुलीसोबत संसार थाटला. लाखो मुली त्यांच्यावर प्रेम करत होत्या. पण त्याने 16 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलं.
advertisement
3/5
ही 15 वर्षांची मुलगीसुद्धा त्याची फॅन होती, पण तो आपल्या आयुष्याचा जोडीदार होईल, याची कल्पनाही तिला नव्हती. लग्नानंतर तीसुद्धा अभिनेत्री बनली. लग्न आणि स्थायिक झाल्यानंतर त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून तिने ब्लॉकबस्टर पदार्पण केलं. अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत तिने काम केलं.
advertisement
4/5
लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. दोघींनीही त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं. पण त्यांना त्यांच्या पालकांइतके यश आणि लोकप्रियता मिळाली नाही.
advertisement
5/5
तो सुपरस्टार दुसरा तिसरा कुणी नाही तर राजेश खन्ना आहे, जे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार. त्यांनी डिम्पल कपाडियाशी लग्न केलं. दोघांच्या वयात 15 वर्षांचा फरक आहे. आत राजेश खन्ना या जगात नाहीत. 18 जुलै 2012 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूला आता 13 वर्षे उलटली आहेत. पण तरी लोक त्यांना विसरलेले नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडचा सुपरस्टार ज्याच्यावर लाखो हसीना फिदा; पण त्याने 16 वर्षांच्या मुलीसोबत थाटला संसार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल