
हिवाळा सुरू होताच थंडीमुळे सर्दी, खोकला, थकवा आणि अशक्तपणाच्या तक्रारी वाढताना दिसतात. तापमानात होणाऱ्या घटमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आहारात योग्य पोषणमूल्य असलेले पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. हिवाळ्यात अंडी आणि ऊस हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी उपयुक्त ठरत असून, ते नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला बीड जिल्ह्यातील विलास राठोड या तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 12:53 ISTछत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर दररोज नवीन नवीन गोष्टीचा ट्रेंड असतो. काही ट्रेंड आपण हे हसून बघतो आणि काहींकडे आपण दुर्लक्ष करतो पण त्या मधले काही जे ट्रेंड असतात ते बघून आपल्याला देखील ते करण्याची इच्छा होते आणि त्याचा मोह आपल्याला आवरत नाही. त्यापैकीच एक म्हणजे सध्याला सोशल मीडियावरती मसाला चकलीची रेसिपी खूप व्हायरल होत आहे. तर ती मसाला चकली घरी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत. ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होते.
Last Updated: Dec 29, 2025, 14:32 ISTपुणे: आयटी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात उच्च पगाराची नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र पुण्यातील मानसी निघोट हिने केमिकल इंजिनिअरिंगमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून पूर्णपणे वेगळ्या वाटेवर चालत गाईच्या शेणापासून विविध कलात्मक वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आज त्या या व्यवसायातून दरमहा सुमारे 40 हजार रुपयांपर्यंत नफा कमावत आहेत
Last Updated: Dec 29, 2025, 14:00 ISTअमरावती : सद्यस्थितीमध्ये अनेकजण सौंदर्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. त्वचा उजळ दिसावी, चेहऱ्यावरील टॅनिंग कमी व्हावी, चेहऱ्यावरील केसांचा रंग फिकट व्हावा यासाठी अनेकजण फेशियल आणि ब्लिचचा वापर करतात. मात्र तात्काळ परिणाम देणारे हे ब्लिच दीर्घकाळ त्वचेसाठी कितपत सुरक्षित आहे? हा देखील एक प्रश्न उभा राहतो. कारण ब्लिचमध्ये वेगवेगळे केमिकल असतात. त्यामुळे त्वचेला हानी पोहोचते, असं डॉक्टरांकडून सांगण्यात येते. याबाबत अधिक माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 13:38 ISTशिवसेना उबाठाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यात भाजपला त्यांनी अॅनाकोंडाची उपमाही दिली होती. त्यामुळे भाजपचे नेते नवनाथ बन यांनीही त्याचं चोख उत्तर दिले. ते म्हणाले, " ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अॅनाकोंडा तुम्ही आहात."
Last Updated: Dec 28, 2025, 22:01 IST