अवघ्या 5 रुपयांत आरोग्य सेवा, पुण्यात गरजूना होतोय मोठा फायदा, काय आहे उपक्रम?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुण्यातील उमेश चव्हाण हे अवघ्या 5 रुपयांत आरोग्य सेवा देत आहेत. या उपक्रमामुळे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मोठा दिलासा मिळत आहे
advertisement
1/7

पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. असाच एक उपक्रम गेल्या काही महिन्यापासून राबवला जात आहे.
advertisement
2/7
पुण्यातील उमेश चव्हाण हे अवघ्या 5 रुपयांत आरोग्य सेवा देत आहेत. या उपक्रमामुळे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मोठा दिलासा मिळत आहे
advertisement
3/7
रुग्ण हक्क परिषदेच्या पृथ्वी मोबाइल क्लिनिक या उपक्रमातून उमेश चव्हाण अवघ्या 5 रुपयांमध्ये आरोग्यसेवा देत आहेत. नुकतेच या उपक्रमाचे 111 वे शिबिर पार पडले. आतापर्यंत 10 हजार 77 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
advertisement
4/7
तब्बल 60 ठिकाणी ही मोबाइल आरोग्यसेवा राबवली जात आहे. या प्रत्येक शिबिरात दोन डॉक्टर, दोन नर्स, एक वाहनचालक, एक समन्वयक आणि दोन मदतनीस अशी टीम काम करत आहे.
advertisement
5/7
यामध्ये एमआरआय आणि सिटी स्कॅनसारख्या महागड्या तपासण्या देखील मोफत करून दिल्या जातात .गंभीर स्वरूपाच्या आजारांवर शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच प्रत्येक वस्तीत महिन्यातून किमान एकदा शिबिर घेऊन तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
advertisement
6/7
कष्टकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी गरजूंकरिता अवघ्या दहा रुपयांत झुणका-भाकर केंद्र सुरू करून सामाजिक उपक्रम उभा केला होता. त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेत, गरजू नागरिकांना दर्जेदार तपासणी, करून औषधोपचार केवळ पाच रुपयांत उपलब्ध करून देण्याचा पुढाकार रुग्ण हक्क परिषदने घेतला आहे.
advertisement
7/7
आतापर्यंत 107 ठिकाणी आरोग्यसेवा देण्यात आली आहे. रुग्ण हक्क परिषदेशी संलग्न ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात असून, त्यासाठीचा संपूर्ण खर्च उमेश चव्हाण यांच्या पुढाकारातून केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
अवघ्या 5 रुपयांत आरोग्य सेवा, पुण्यात गरजूना होतोय मोठा फायदा, काय आहे उपक्रम?