Health Tips : अशक्तपणा अन् ताप, अजिबात करू नका दुर्लक्ष, असू शकतो गंभीर आजाराचा धोका
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
हाडांचा कॅन्सर एक दुर्मिळ पण गंभीर प्रकार आहे. या कॅन्सरमुळे सुरुवातीच्या टप्प्यावर निदान न झाल्यास रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
1/7

अलीकडच्या काळात हवामान आणि जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. हवामान बदलामुळे प्रदूषण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यामध्ये हाडांचा कॅन्सर एक दुर्मिळ पण गंभीर प्रकार आहे. या कॅन्सरमुळे सुरुवातीच्या टप्प्यावर निदान न झाल्यास रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे गरजेचे आहे. हाडांचा कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? तसेच काय काळजी घ्यावी? याबाबत माहिती डॉ. दिलीप राऊत यांनी दिली आहे.
advertisement
2/7
डॉ. दिलीप राऊत सांगतात की, हाडांचा कॅन्सर हा एक दुर्मिळ आजार आहे. यामध्ये हाडांच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ व्हायला लागते. त्यामुळे हाडे कमजोर, कमकुवत आणि विद्रूप होऊ शकतात. जेव्हा कॅन्सरची सुरुवात थेट हाडांपासूनच होते, त्याला ऑस्टिओसारकोमा असं म्हटलं जातं.
advertisement
3/7
हाडांच्या कॅन्सरची सुरुवातीला फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे तो उशिरा समजतो. खालील लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
4/7
हाडांच्या कॅन्सरमध्ये रात्री किंवा हालचाली करताना वेदना वाढते. हाडं कमकुवत होऊन किरकोळ आघातानेही मोडतात. अशक्तपणा, थकवा आणि ताप येतो. अचानक वजन कमी होणे. हालचालींमध्ये अडथळा येणे ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
5/7
हाडांचा कॅन्सर सुरुवातीला ओळखला गेला आजाराचे एमआरआय, एक्स-रे, बायोप्सी यांसारख्या तपासण्या करून निदान करता येऊ शकते. तसेच केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपीद्वारे यावर उपचार केले जातात.
advertisement
6/7
हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D, प्रोटीनयुक्त आहार आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, सुकामेवा याचा समावेश करू शकता. हाडं आणि स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी चालणे, योगा, स्ट्रेचिंग अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे व्यायाम करणे गरजेचे आहे. धुम्रपान शरीरातील पेशींवर वाईट परिणाम करते आणि कॅन्सरचा धोका वाढवते. त्यामुळे धुम्रपान टाळणे गरजेचे आहे.
advertisement
7/7
काही प्रकारचे कॅन्सर आनुवंशिक असतात. जोखीम असल्यास वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. कसलीही गाठ किंवा वेदना दीर्घकाळ असल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच उपचार सुरू करावेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : अशक्तपणा अन् ताप, अजिबात करू नका दुर्लक्ष, असू शकतो गंभीर आजाराचा धोका