Weather Alert: अंगाची लाहीलाही होणार, मार्चमध्येच चाळीशी पार, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात मार्चमध्येच उष्णतेनं कहर केल्याचं चित्र आहे. तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्यानं यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही भागात उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला असून उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 6 मार्च रोजी राज्यातील हवामान स्थिती कशी राहील? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
6 मार्च रोजी राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. सरासरीपेक्षा 2-4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाची तीव्रता जास्त राहणार आहे. या भागात कमाल तापमान 37-40 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/7
कोकणात 6 आणि 7 मार्च रोजी उष्ण आणि दमट स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना आज पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ५ मार्चला काही ठिकाणी हीटवेव्हसारखी स्थिती होती, पण 6 मार्चला मुख्यतः उष्ण-दमट हवामान राहील.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रात आज हवामान कोरडे राहील. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात 2-3 अंशांची वाढ होईल. पुणे, सातारा, सांगली भागात कमाल 34-37 अंश तर किमान 18-21 अंश सेल्सिअस तापमान राहील. त्यामुळे सकाळी काही प्रमाणात गारवा जाणवू शकतो.
advertisement
5/7
मराठवाड्यात कोरडे आणि उष्ण हवामान आहे. कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज ते 3-39 अंशांदरम्यान राहील. तर किमान तापमान 19-22 अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर, नांदेड भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.
advertisement
6/7
सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण भाग विदर्भ आहे. कमाल तापमान 37-40 सेल्सिअसपर्यंत तर किमान 20-23 अंशांवर राहील. नागपूर, अमरावती, अकोला भागात तीव्र उकाडा जाणवणार आहे. हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहणार असून पावसाची शक्यता नाही.
advertisement
7/7
दरम्यान, मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ‘हिट वेव्ह’ सदृश्य स्थिती काही भागांत झाली आहे. या उष्णतेच्या लाटांपासून सावध राहावे लागेल. भरपूर पाणी प्या, दुपारी बाहेर पडणे टाळा. कोकणात उमस जास्त असल्याने हायड्रेटेड राहण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: अंगाची लाहीलाही होणार, मार्चमध्येच चाळीशी पार, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट