क्षणात कुटुंब उद्ध्वस्त, बारामतीत पतीच्या डोळ्यादेखत पत्नी अन् मुलीचा करुण अंत, मन हेलावणारी घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Baramati Road Accident News: पुणे जिल्ह्याच्या बारामती-पारवडी रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. गुरुवारी सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली.
advertisement
1/7

पुणे जिल्ह्याच्या बारामती-पारवडी रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. बुधवारी रात्री ही भीषण अपघाताची घटना घडली.
advertisement
2/7
अपघातग्रस्त दुचाकीवरून एकाच कुटुंबातील चार सदस्य जात होते. यात पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचा समावेश होता. मात्र या सुखी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
advertisement
3/7
भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा आणि तिच्या चिमुकल्या मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
advertisement
4/7
या अपघातात पती आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
advertisement
5/7
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, ही दुचाकी रस्त्याच्या बाजुला फेकली गेली. तर चारचाकी वाहनाचेही मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
6/7
एकाच कुटुंबातील दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याची बातमी समजताच पारवडी आणि बारामती परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
7/7
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताचा नेमका कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
क्षणात कुटुंब उद्ध्वस्त, बारामतीत पतीच्या डोळ्यादेखत पत्नी अन् मुलीचा करुण अंत, मन हेलावणारी घटना