TRENDING:

Shani Asta 2026: आलीच ती वेळ! 13 मार्चला शनिदेव पुन्हा होणार अस्त; या राशींची साडेसाती सुटल्यात जमा

Last Updated:
Shani Asta 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्माचं फळ देणारा ग्रह मानलं जातं. हा ग्रह सगळ्यात संथ गतीने चालणारा असल्यामुळे एका राशीत जवळपास अडीच वर्षं राहतो, म्हणूनच याचा परिणाम बराच काळ टिकून राहतो. सध्या शनी मीन राशीत आहे आणि 2 जून 2027 पर्यंत तिथेच राहणार आहे. या काळात शनी कधी वक्री होईल, कधी मार्गी, तर कधी अस्त-उदय अवस्थेत असेल.
advertisement
1/6
आलीच ती वेळ! 13 मार्चला शनिदेव पुन्हा अस्ताला; या राशींची साडेसाती सुटल्यात जमा
द्रिक पंचांगानुसार, 13 मार्च 2026 रोजी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी शनी मीन राशीत अस्त होईल. त्यानंतर सुमारे 40 दिवस अस्त अवस्थेत राहून 22 एप्रिल 2026 रोजी बुधवारी पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी शनीचा पुन्हा उदय होईल. असं मानलं जातं की जेव्हा शनी अस्त होतो, तेव्हा त्याचे कडक किंवा कठीण परिणाम काही प्रमाणात कमी होतात. त्यामुळे काही राशींना या काळात मोठा दिलासा आणि फायदा मिळण्याचे योग आहेत.
advertisement
2/6
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा अस्त होणं लय दिलासा देणारं ठरू शकतं. तुमच्या कुंडलीच्या 12 व्या घरात शनी अस्त होईल, जिथे साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. अशा वेळी वायफळ खर्चावर लगाम बसेल आणि पैशांची स्थिती हळूहळू सुधारेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि तुम्हाला बरं वाटेल.
advertisement
3/6
मेष राशीला परदेशात जाण्याचे किंवा परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याचे योग आहेत. जी कामं खूप दिवसांपासून रखडली होती, ती आता पुढे सरकतील. फक्त ऑफिसमध्ये विनाकारण वादात पडू नका आणि सावध राहा.
advertisement
4/6
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही वेळ अनेक बाबतीत फायद्याची ठरू शकते. शनी तुमच्या 5 व्या घरात अस्त होणार असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि थांबलेली कामं पुन्हा सुरू होतील. नोकरी आणि धंदा या दोन्हीत प्रगतीची संधी मिळेल. प्रमोशन मिळण्याचे किंवा नवीन मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत.
advertisement
5/6
वृश्चिक राशीच्या व्यापाऱ्यांना नवीन ऑर्डर्स किंवा मोठ्या डील्स मिळू शकतात. मात्र, मुलांच्या बाबतीत किंवा अभ्यासाच्या बाबतीत थोडी चिंता वाढू शकते, तिथे गाफील राहू नका. खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
6/6
कुंभ - कुंभ राशीसाठी शनीचा अस्त होणं संमिश्र फळ देणारं असलं, तरी एकूण फायद्याचेच संकेत आहेत. शनी तुमच्या 2 व्या घरात अस्त होईल आणि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या काळात कमाईचे नवीन रस्ते उघडतील आणि तुमच्या कष्टाचं चीज होईल. नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल. मालमत्तेच्या कामात फायदा मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची बोलण्याची पद्धत थोडी कडक होऊ शकते, ज्यामुळे नात्यात तणाव येईल. त्यामुळे विचार करून बोला आणि खर्चावर ताबा ठेवा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Asta 2026: आलीच ती वेळ! 13 मार्चला शनिदेव पुन्हा होणार अस्त; या राशींची साडेसाती सुटल्यात जमा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल