TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : 'रारा'च्या प्रेमाला ग्रहण! राकेशनं पुन्हा नाकारलं राखीचं प्रेम, आधी केस कापले, आता काय करणार ड्रामा क्वीन?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 च्या घरात राखी आणि राकेश यांच्यातील गोड नातं सगळेच एन्जॉय करत होते. अशातच 'रारा'च्या गोड नात्याला ग्रहण लागल्याचं पाहायला मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bigg Boss Marathi 6 च्या घरात ड्रामा, राडा करणारी कोणी सदस्य असेल तर ती राखी सावंत. राखी घरात आल्यापासून चांगलाच गोंधळ घालतेय. राखी आल्यानंतर घरातील नात्यांचे समीकरण बदलताना दिसत आहेत. घरात गोड मैत्री म्हणून ओळखली जाणारी राखी आणि राकेशची जोडी. भाऊच्या धक्क्यावर दोघांच्या जोडीला 'रारा' असं नाव देण्यात आलं. राखीचं लग्न करण्याची इच्छा देखील टास्कच्या स्वरुपात पूर्ण करण्यात आली. घरात राखी आणि राकेश यांच्यातील गोड नातं सगळेच एन्जॉय करत होते. अशातच 'रारा'च्या गोड नात्याला ग्रहण लागल्याचं पाहायला मिळणार आहे.
News18
News18
advertisement

आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये राखी राकेशला म्हणताना दिसते, "सगळ्यांना तुझं माझं नडतंय." त्यावर राकेश शांतपणे उत्तर देतो, "मग त्यांना जाऊन सांग आपण फ्रेंड्स आहोत आता." राखी लगेच म्हणते, "सो वी आर फ्रेंड्स नाऊ." मात्र राकेश पुढे म्हणतो, "मला दुसऱ्यांदा हर्ट नाही करायचं" आणि तिथून निघून जातो.

( Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसने मध्येच थांबवलं, राखी मोठ्याने किंचाळली; कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेतसोबत भयंकर घडलं? )

advertisement

राकेशच्या या शब्दांनी राखी खूप हर्ट होते. त्यानंतर ती गार्डन एरियामध्ये त्राण नसल्यासारखी उठते आणि हळूहळू स्विमिंग पूलकडे चालत जाते. घरातील सदस्य तिच्याकडे पाहत असतानाच राखी पूलच्या दुसऱ्या पायरीवर उभी राहते आणि अचानक स्वतःला पाण्यात झोकून देते.

पाण्यात पडल्यावर ती मोठ्याने रडत I Am Loser असं म्हणताना ऐकू येते. तिचा हा इमोशनल डाऊन फॉल पाहून घरातील सदस्य घाबरतात. सगळे मोठ्याने 'राखी… राखी…' अशी हाक मारू लागतात. काही सदस्य तिला बाहेर काढण्यासाठी धाव घेतात. याआधी देखील राकेशच्या बोलण्यामुळे राखी हर्ट झाली होती. राकेशचा नकार ऐकून तिने स्वत:चे केस कापले होते. आता राकेशनं पुन्हा तिला नकार दिलाय. आता राखी काय करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

येणाऱ्या भागात राकेश आणि राखी यांच्यात पुन्हा संवाद होणार का, की हे नातं इथंच तुटणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं लिहिलंय, "अरे आस करू राकेश राखीकड खूप पैसे संपती आहे दुबई आणि मुंबईमधी." दुसऱ्यानं लिहिलंय, "या चंद्राला कधीच ग्रहण नाही लागत हा चंद्र लोकांना ग्रहण लावतो." आणखी एकानं लाफ्टर इमोजी पोस्ट करत लिहिलंय, "कुठलं नातं.....? सगळं फेक आहे."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'रारा'च्या प्रेमाला ग्रहण! राकेशनं पुन्हा नाकारलं राखीचं प्रेम, आधी केस कापले, आता काय करणार ड्रामा क्वीन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल