TRENDING:

Mumbai Shopping: सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; अवघ्या 30 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट

Last Updated:
Mumbai Shopping: या गल्लीत ज्वेलरीची किंमत फक्त 30 रुपयांपासून सुरू होते, त्यामुळे कोरियन ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे मार्केट माहितीच असलं पाहिजे.
advertisement
1/7
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे होलसेल खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. बाहेरच्या बाजारात ज्या वस्तू जास्त किमतीत मिळतात, त्या इथे तुलनेने कमी दरात मिळतात. त्यामुळे अनेकजण व्यवसायासाठी लागणारा माल खरेदी करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये येतात. ज्वेलरी आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीजच्या बाबतीतही हे मार्केट ओळखीचे ठिकाण आहे.
advertisement
2/7
क्रॉफर्ड मार्केटमध्ये जुम्मा मशिदीच्या अगदी समोर असलेल्या गल्लीत कोरियन ज्वेलरी मोठ्या प्रमाणात मिळते. हीच ती गल्ली आहे जिथे ब्रासलेट, नेकलेस आणि अ‍ॅंकलेट्स होलसेल दरात विकले जातात. या गल्लीत ज्वेलरीची किंमत फक्त 30 रुपयांपासून सुरू होते, त्यामुळे कोरियन ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही खरेदीची जागा ठरते.
advertisement
3/7
इथे मिळणाऱ्या कोरियन ब्रासलेटमध्ये वॉच अ‍ॅड केलेली ब्रासलेट, हार्ट शेप पल्स, साधी राऊंड पल्स, वाईड पल्स डिझाइन, वेगवेगळ्या रंगांची पल्स, मोत्याची ब्रासलेट, कोरियन पर्ल ब्रासलेट, पर्ल चेन ब्रासलेट तसेच ईगल आय स्टोन आणि वर्ड्स डिझाइन असलेली ब्रासलेट पाहायला मिळतात.
advertisement
4/7
ब्रासलेटसोबतच या गल्लीत कोरियन ज्वेलरी प्रकारातील नेकलेसही मिळतात. हे नेकलेस डेली वापरासाठी तसेच पार्टीवेअरला चालतील अशा साध्या आणि हलक्या डिझाइन्समध्ये असतात.
advertisement
5/7
मिनिमल चेन नेकलेस, छोटे पेंडंट असलेले नेकलेस, लेयर नेकलेस आणि मोत्याचा टच असलेले नेकलेस इथे उपलब्ध आहेत. यासोबतच अ‍ॅंकलेट्सचाही पर्याय आहे. साध्या चेन अ‍ॅंकलेट्स, मोत्याच्या अ‍ॅंकलेट्स आणि स्टोन अ‍ॅड केलेल्या अ‍ॅंकलेट्स या सगळ्या वस्तू होलसेलमध्ये विकल्या जातात.
advertisement
6/7
या ज्वेलरीच्या किंमती डिझाइननुसार बदलतात. काही ब्रासलेट, नेकलेस आणि अ‍ॅंकलेट्स 30 रुपयांपासून मिळतात. काही प्रकार 40 आणि 75 रुपयांच्या दरात आहेत, तर काही मोती आणि स्टोन वर्क असलेल्या ज्वेलरी 100 रुपयांपर्यंत होलसेलमध्ये मिळतात. हीच ज्वेलरी बाहेरच्या बाजारात अधिक दराने विकली जाते.
advertisement
7/7
क्रॉफर्ड मार्केटमधील जुम्मा मशिदीसमोरची ही गल्ली कोरियन ज्वेलरीच्या होलसेल खरेदीसाठी ओळखली जाते. कमी दरात विविध प्रकारची ज्वेलरी एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे या गल्लीत खरेदीसाठी सतत वर्दळ दिसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mumbai Shopping: सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; अवघ्या 30 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल