NZ vs SA : 77 बॉलमध्ये आफ्रिकेचा खेळखल्लास, टीम इंडियाच्या मॅचआधी न्यूझीलंडचा धडकी भरवणारा विजय
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
न्यूझीलंड हा सामना जिंकल्याने आता थेट टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता त्यांचा सामना हा रविवारी 8 मार्चला भारत किंवा इंग्लंड या दोन संघापैकी दुसरी फायनल जिंकणाऱ्या संघासोबत होणार आहे.
advertisement
1/8

टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये आज न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेचा 9 विकेट राखून पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंड फायनलला पोहोचली आहे.
advertisement
2/8
साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून टीम सिफर्ट आणि फिन एलेन ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या बॉलपासून प्रहार करायला सूरूवात केली होती.
advertisement
3/8
या दोन्ही खेळाडूंच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडने पॉवरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 84 धावांचा पल्ला गाठला होता.त्यानंतर त्यांनी 8 ओव्हरमध्ये आपल्या 100 धावा पुर्ण केल्या होत्या.
advertisement
4/8
या दरम्यान टीम सिफर्टने 31 बॉलमध्ये 50 तर फिन एलेनने 19 बॉलमध्ये आपल्या 50 धावा पूर्ण केल्या होत्या. पण त्यानंतर टीम सिफर्ट 33 बॉलमध्ये 58 धावा करून बाद झाला.त्याने कगिसो रबाडाने क्लि बोल्ड केले.
advertisement
5/8
टीम सिफर्ट बाद झाल्यानंतर रचिन रविंद्र मैदानात आला होता.त्यामुळे एक विकेट पडल्यानंतर धावांचा वेग कमी होईल असे वाटत होते. पण फिन एलेन थांबायचा नाव घेत नव्हता. आणि न्यूझीलंडला जिंकवूनच त्याने दम घेतला.
advertisement
6/8
फिन एलेनने यावेळी 33 बॉलमध्ये 100 धावांची नाबाद शतकीय खेळी केली होती. या शतकीय खेळीच्या बळावर त्याने 12.5 म्हणजेच 77 बॉलमध्ये मॅच जिंकवली.त्यामुळे साऊथ आफ्रिकेचा 9 विकेटने पराभव झाला.
advertisement
7/8
दरम्यान मार्का यान्सनने 30 बॉलमध्ये 55 धावांची नाबाद खेळी केली होती. या वादळी खेळीमुळे साऊथ आफ्रिकेने 169 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे न्यूझीलंडसमोर 170 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
8/8
न्यूझीलंड हा सामना जिंकल्याने आता थेट टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता त्यांचा सामना हा रविवारी 8 मार्चला भारत किंवा इंग्लंड या दोन संघापैकी दुसरी फायनल जिंकणाऱ्या संघासोबत होणार आहे. या दुसऱ्या फायनलचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
NZ vs SA : 77 बॉलमध्ये आफ्रिकेचा खेळखल्लास, टीम इंडियाच्या मॅचआधी न्यूझीलंडचा धडकी भरवणारा विजय