TRENDING:

Mandana Karimi: "भारताने माझा विश्वासघात केला, म्हणून मी...", 'बिग बॉस 9' फेम अभिनेत्रीच्या वक्तव्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या...

Last Updated:

आखाती देशांमधली परिस्थिती बिकट असताना, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने भारत सोडून पुन्हा इराणला जाण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमेरिका आणि इस्राईलने 'इराण'वर एकत्रित केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणवर हल्ला करण्याचं सत्र सुरू आहे. इराणमध्ये सुरूवातीचे दोन ते तीन दिवस संपूर्ण जगभरामध्ये विमान सेवा सुद्धा बंद होती. आता ती कालांतराने हळूहळू सुरू होत आहे. अशातच आखाती देशांमधली परिस्थिती इतकी बिकट असताना, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस ९ फेम मंदाना करिमी हिने भारत सोडून पुन्हा इराणला जाण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
News18
News18
advertisement

बिग बॉस ९ फेम मंदाना करिमी हिने अलिकडेच बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इराणला जाण्याचा निर्णय सांगितला आहे. अभिनेत्रीने दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणालीये की, "मी अशा स्वतंत्र्य इराणबद्दल कल्पना करते, जे राष्ट्र महिलांसाठी मुक्त राष्ट्र असेल. जिथे महिला त्यांना जे हवे ते करू शकतील, त्यांना जे हवे ते कपडे घालू शकतील आणि त्यांना हवे त्या विद्यापीठात जाऊन त्या शिक्षण घेऊ शकतील. मी असा इराण पाहतेय, ज्याचे इतर मध्य पूर्वेतील राष्ट्रांशी चांगले संबंध असतील, जिथे इराण हा राष्ट्र इतर कोणासाठीही धोका नसेल, तर एक राष्ट्र असेल. प्रगतीच्या दृष्टीने पुढे जाणारा राष्ट्र म्हणून पाहतेय."

advertisement

मंदाना करिमी पुढे म्हणाली की, "हे संकट संपल्याची घोषणा होताच मी भारतातून निघून जाणार आहे. मी माझ्या बॅगा पॅक केल्या आहेत आणि मी भारतही सोडत आहे. माझा प्लॅन तयार झालेला आहे, कारण मला असं वाटतंय की माझं आणि भारताचं नातं संपत आलंय." मंदानाने भारतातील तिच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तिने स्पष्ट केले की, "मी खूप लहान असतानाच भारतात आली आहे. मला इथे आल्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करायला मिळाले. तसेच मला इथे खूप मित्रही मिळाले. पण दुर्दैवाने, मी निदर्शनांमध्ये सामील झाले आणि इराणबद्दल जाहीरपणे बोलल्यावर माझे अनेक मित्र माझ्यापासून दुरावले," असं मंदाना म्हणाली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

"मला वाटतं की भारताने माझा विश्वासघात केला आहे. भारताने मला जे द्यायचं होतं ते दिलं. पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी पुन्हा इराणमध्ये राहायला जाणार आहे, असं मला वाटतंय." असं मंदाना करीमीने सांगितलं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Mandana Karimi: "भारताने माझा विश्वासघात केला, म्हणून मी...", 'बिग बॉस 9' फेम अभिनेत्रीच्या वक्तव्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल