TRENDING:

Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, गँगरस्टर निलेश घायवळच्याही मारली कानाखाली, गोळीबारात जखमी सागर मोहोळकर आहे कोण?

Last Updated:
पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळवर भर कुस्तीच्या मैदानात कानाखाली मारणाऱ्या कुख्यात गुंड आणि पैलवात सागर मोहळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे
advertisement
1/11
गँगरस्टर निलेश घायवळच्याही मारली कानाखाली, गोळीबारात जखमी सागर मोहोळकर आहे कोण?
पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीची संपूर्ण जिल्ह्यात दहशत आहे. पण, त्याच्या दहशतीला न जुमानता भर कुस्तीच्या मैदानात निलेश घायवळच्या कानाखाली मारणाऱ्या कुख्यात गुंड आणि पैलवात सागर मोहळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. गोळीबारात तो जखमी असून रुग्णालयात दाखल केलं आहे.  
advertisement
2/11
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर  जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गुंड आणि पैलवान असलेल्या सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला. हल्लेखोरांनी सागरच्या चेहऱ्यावरच गोळीबार केला.  सागर मोहोळकरची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.
advertisement
3/11
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सागरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सागरच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. पण, तो थोडक्यात बचावला आहे.
advertisement
4/11
याच सागरने  पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवाळच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर सागर मोहोळकर हा चर्चेमध्ये आला होता. घायवळच्या विरोधात सागर मोहोळकर याचे वडिलांनी २ दिवसांपूर्वी जामखेड पूर्णामध्ये गुन्हा दाखल केला होता.
advertisement
5/11
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी तातडीने परिसर नाकाबंदी करत तपास सुरू केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. गोळीबारामागील कारण वैयक्तिक वैर, गँगवॉर की इतर काही, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून करण्यात येत आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
advertisement
6/11
 कोण आहे सागर मोहोळकर?  सागर मोहोळकर हा पैलवान असला तरी गुंड आहे. काही  वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला या प्रकरणात अटक झाली होती, त्यामुळे तो तुरुंगात देखील होता. 
advertisement
7/11
जेलमध्ये गेल्यानंतर सागर तिथेही काही सुधारलाा नाही. त्याने तुरुंगात आणखी एकाचा खून केला होता. शिक्षा भोगल्यानंतर काही दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो निलेश घायवळशी भिडला होता. 
advertisement
8/11
 निलेश घायवळच्या का मारली कानाखाली - एप्रिल २०२५ मध्ये  धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेच्या दरम्यान ही घटना घडली होती. जत्रेत कुस्तीचा फड आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुस्तीच्या फडात  सागरने सगळ्यांसमोर येऊन निलेशच्या कानाखाली लगावली होती.
advertisement
9/11
गावात दोन कुस्त्यांचे फड एकाच वेळी सुरू झाले होते. एक राजकीय विरोधकांचा फड होता आणि एक सार्वजनिक गावाचा फड होता. राजकीय विरोधकांनी आयोजित केलेल्या फडात बाहेरील पहिलवानाला खेळवलं होतं. गावचा सार्वजनिक कुस्तीचा फड उधळण्यासाठी त्याला अधिकचं बक्षिस दिलं होतं. यात सागरने उडी घेतली आणि कुस्ती लावण्याची मागणी केली.  
advertisement
10/11
पण,  सागरने माझी कुस्ती लावा यासाठी तो मागणी करत होता, पंचांकडे मागणी केली पण त्यांनी दुर्लक्ष केलं. आधीच नियोजित कुस्त्यांमुळे त्याची मागणी आयोजकांनी फेटाळून लावली होती. निलेश घायवळ देखील तिकडे होता, पहिलवानाला बक्षीस देत होता.
advertisement
11/11
पहिलवानांमध्ये घायवळ प्रसिद्ध असल्यानं त्यांच्याशी संवाद साधला जात होता. त्यावेळी तो  सागर कुस्ती लावण्यासाठी मागणी करत होता. त्याच दरम्यान निलेश घायवळ मैदानात असताना आखाड्यात घुसून सागरने निलेशच्या कानाशिलात लगावली. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, गँगरस्टर निलेश घायवळच्याही मारली कानाखाली, गोळीबारात जखमी सागर मोहोळकर आहे कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल