Snake Bite: पावसाच्या पाण्यात दंश मारला तरी कळणार नाही, साप विषारी की बिनविषारी कसा ओळखायचा?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पावसाला सुरुवात झाली की बिळात लपलेले साप बाहेर पडतात. यातील काही साप विषारी तर काही बिनविषारी असतात.
advertisement
1/7

पावसाला सुरुवात झाली की बिळात लपलेले साप बाहेर पडतात. यातील काही साप विषारी तर काही बिनविषारी असतात. विषारी सापांचा धोका अधिक असतो.
advertisement
2/7
परंतु, हे साप अनेकांना ओळखता येत नाहीत. याबाबतच अहिल्यानगर येथील सर्पमित्र संदीप खरे यांनी माहिती दिलीये.
advertisement
3/7
पावसाळ्यात मानवी वस्तीमध्ये वस्तीमध्ये जास्त करून बिनविषारी साप आढळून येतात. तरीही पावसाळा सुरू झाल्यावर खबरदारी घेतली पाहिजे.
advertisement
4/7
घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवणे, घराच्या आजूबाजूला किंवा घराबाहेर जास्त अडचण करू नये तसेच गाडी चालू करताना काळजी घेतली पाहिजे. ही दक्षता घेतली तर सर्पदंश होणार नाही. तसेच सर्पदंश झाल्यास तात्काळ रुग्णालयात जावे, असेही सर्पमित्र खरे सांगतात.
advertisement
5/7
विषारी सापांचे प्रकार : महाराष्ट्रात नाग, घोणस, मन्यार ,फुरसे आणि पोवळा हे विषारी साप जास्त प्रमाणात आढळून येतात.
advertisement
6/7
बिनविषारी सापांचे प्रकार : बिनविषारी सापांमध्ये धामण, तस्कर, गवत्या, कवड्या, मांडूळ, डुरक्या घोणस, विरोळा, चित्रांग, नायकोड, कुकरी, नानिटी, धूळ नागिन हे आढळून येतात.
advertisement
7/7
पावसाळ्यात घराजवळ किंवा इतर ठिकाणी साप दिसल्यास आधी सर्पमित्राला संपर्क करावा. सापाला मारू नये. तसेच सर्पमित्र येईपर्यंत सापावर लक्ष ठेवावे. महाराष्ट्रात जास्त प्रमाणात विषारी सापांपैकी चार मुख्य विषारी साप नाग, घोणस, मन्यार आणि फुरसे आढळून येतात. त्यामुळे इतर सापांचा सर्पदंश झाल्यास तुलनेने धोका कमी असतो. तरीही रुग्णालयात उपचार घ्यावे, असेही खरे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Snake Bite: पावसाच्या पाण्यात दंश मारला तरी कळणार नाही, साप विषारी की बिनविषारी कसा ओळखायचा?