बजेटनंतर सोन्या-चांदीची स्थिती काय, किंमती वाढल्या की कमी झाल्या? पाहाच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
बजेट 2026 सादर करण्यात आले. यानंतर भारतीय सराफा बाजारात मोठं चढ-उतार पाहिला गेला. चला जाणून घेऊया काय सुरु आहेत सोन्या-चांदीच्या किंमती...
advertisement
1/8

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेट 2026 सादर केलं. यानंतर भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किंमतीत मोठी घडामोड पाहायला मिळाली. या आठवड्याच्या सुरुवातीला विक्रमी उंचीवर गेल्यानंतर किंमतींमध्ये अचानक आलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना चकीत केले आहे. रविवारी, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 16,073 रुपये नोंदवण्यात आला. ज्वेलरी उद्योगातील तज्ञांचा असा विश्वास आहे की अर्थसंकल्पात धोरणात्मक सातत्य बाजारात स्थिरता आणेल, ज्यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहक दोघांनाही चांगले नियोजन करता येईल.
advertisement
2/8
'डिशीज डिझाइनर ज्वेलरी'(DishiS Designer Jewellery चे फाउंडर डिशी सोमानी यांच्यानुसार भारतीय कुटुंबासाठी सोने-चांदी फक्त धातू नाही तर भावनात्मक आणि वित्तीय सुरक्षा कवच आहे.
advertisement
3/8
अर्थसंकल्पातील व्यवसाय-अनुकूल परिस्थिती आणि MSMEsसाठी सहाय्यक धोरणे दागिन्यांच्या क्षेत्रात पारदर्शकता आणि डिझाइन नवोपक्रमांना प्रोत्साहन देतील. हा बदल केवळ आधुनिक ग्राहकांच्या दर्जेदार कारागिरीची मागणी पूर्ण करणार नाही तर जबाबदार सोर्सिंग पद्धतींना देखील बळकटी देईल, ज्यामुळे संपूर्ण ज्वेलरी इकोसिस्टम अधिक विश्वासार्ह होईल. प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव किती आहेत पाहूया...
advertisement
4/8
दिल्ली: 24 कॅरेट सोन्याचा भाव 16,073 रुपये, 22 कॅरेटचा भाव 14,735 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 12,059 रुपये प्रति ग्रॅम होता. चांदी 350 रुपये प्रति ग्रॅम दराने विकली जात होती.
advertisement
5/8
मुंबई आणि बंगळुरू: या दोन्ही शहरांमध्ये किंमती जवळजवळ दिल्लीच्या बरोबरीच्या होत्या. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹16,058 आणि चांदीचा दर प्रति ग्रॅम ₹350 होता.
advertisement
6/8
ज्वेलरी इंडस्ट्रीवर बजेटचा परिणाम कसा झाला : दिशी सोमाणी यांच्या मते 2026 चा अर्थसंकल्प सोने आणि चांदी उद्योगाचे नियमन करण्यासाठी स्थिर दृष्टिकोन स्वीकारतो. धोरणात्मक स्थिरता बाजारात आणणारी खात्री ज्वेलर्सना त्यांचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यास मदत करते. त्यांनी असेही म्हटले की, एमएसएमईसाठी चांगले वातावरण निर्माण केल्याने दागिने उत्पादनात नवीन तंत्रज्ञानाचा आणि पारदर्शक पद्धतींचा वापर वाढेल, जे दीर्घकाळात ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आवश्यक आहे.
advertisement
7/8
चांदी ऑल टाइम हायवरुन खाली आली : आठवडाभराच्या भावाविषयी बोलायचं झाल्यास, चांदी गुरुवारी 4,04,500 रुपये प्रति किलोग्रामच्या शिखरावर होती. मात्र पुढच्या सत्रात यामध्ये 15 टक्क्यांचं मोठं करेक्शन आलं. सोनंही 1,83,000 रुपये प्रति 10 ग्रामच्या उच्चस्तरावरुन जवळपास 1,69,000 रुपयांपर्यंत आलं.
advertisement
8/8
जागतिक स्तरावर डॉलरची ताकद आणि जास्त किमतींवर नफा बुकिंग ही या घसरणीची मुख्य कारणे मानली जात आहेत, परंतु स्पष्ट बजेट धोरणांमुळे बाजार लवकरच स्थिर होईल अशी तज्ज्ञांना आशा आहे.