TRENDING:

Team India : 5 मॅच 5 चॅलेंज... सीरिज जिंकली, पण T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया 'एक्सपोज' झाली!

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 4-1 ने विजय झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधी ही शेवटची सीरिज असल्यामुळे या विजयाने टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे.
advertisement
1/8
5 मॅच 5 चॅलेंज...  सीरिज जिंकली, पण T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया 'एक्सपोज' झाली!
भारताने सीरिज जिंकली असली तरी 5 सामन्यांमध्ये टीम इंडियाने केलेल्या चुका त्यांना वर्ल्ड कपमध्ये महागात पडू शकतात, त्यामुळे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला या चुकांवर काम करावं लागणार आहे.
advertisement
2/8
टी-20 क्रिकेटमध्ये विजय मिळवण्यासाठी पॉवर प्लेमध्ये मोठा स्कोअर करणं महत्त्वाचं ठरतं, पण न्यूझीलंडविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाला चांगली ओपनिंग मिळाली नाही. दोन सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा शून्य रनवर तर एका सामन्यात संजू सॅमसन शून्य रनवर आऊट झाला.
advertisement
3/8
5 टी-20 सामन्यांच्या या सीरिजमध्ये संजू सॅमसन सपशेल अपयशी ठरला. संजू सॅमसनने 5 सामन्यांमध्ये 9.20 च्या सरासरीने फक्त 46 रन केल्या, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजूला संधी मिळणं मुश्कील झालं आहे.
advertisement
4/8
जसप्रीत बुमराहचा फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. पहिल्या सामन्यात बुमराहने 3 ओव्हरमध्ये 29 रन देऊन एकही विकेट घेतली नाही. दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. तिसऱ्या मॅचमध्ये बुमराहने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या, याबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
5/8
सीरिजच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये बुमराह अपयशी ठरला. चौथ्या सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 9.5 च्या इकोनॉमी रेटने 38 रन देऊन 1 विकेट घेतली. तर पाचव्या सामन्यात बुमराहने तब्बल 14.5 च्या इकोनॉमी रेटने 4 ओव्हरमध्ये 58 रन दिले. बुमराहचा टी-20 आंतरराष्ट्रीय मधली ही सगळ्यात खराब कामगिरी होती.
advertisement
6/8
कुलदीप यादव या सीरिजमध्ये 5 पैकी 3 सामन्यांमध्ये खेळला, पण त्याला इम्पॅक्ट पाडता आला नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यात कुलदीपला 35 रन देऊन 2 विकेट आणि चौथ्या टी-20 सामन्यात 39 रन देऊन 2 विकेट मिळाल्या. तर तिसऱ्या टी-20 सामन्यात कुलदीपने त्याच्या स्पेलमध्ये तब्बल 64 रन दिल्या.
advertisement
7/8
सीरिजच्या पाच टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या बॅटिंगने धमाका केला. 5 पैकी 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाने 200 रनचा टप्पा ओलांडला, पण न्यूझीलंडनेही भारतीय बॉलर्सवर तशाच पद्धतीने आक्रमण केलं. न्यूझीलंडनेही 3 सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त रन केले तर एका सामन्यात 190 पर्यंत मजल मारली.
advertisement
8/8
या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या सगळ्याच बॉलरनी जास्त रन दिल्या, पण बॅटिंगमुळे बॉलर्सची कामगिरी झाकोळून गेली. टी-20 वर्ल्ड कपआधी बॉलर्सचा फॉर्म टीम इंडियासाठी धोक्याची घंटा ठरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : 5 मॅच 5 चॅलेंज... सीरिज जिंकली, पण T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया 'एक्सपोज' झाली!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल