TRENDING:

IND vs PAK : मॅचचा निकाल काही लागो! पाकिस्तानच्या सेमी फायनलच्या चाव्या भारताच्या हातात,कसं आहे समीकरण?

Last Updated:

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने भेदक गोलंदाजी करून भारताचा डाव 252 धावांवर ऑल आऊट केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसमोर 253 धावांचे लक्ष्य आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs Pakistan : आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने भेदक गोलंदाजी करून भारताचा डाव 252 धावांवर ऑल आऊट केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसमोर 253 धावांचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानकडे 50 ओव्हर आहेत. पण या 50 ओव्हरमध्ये जरी पाकिस्तानने लक्ष्य गाठून सामना जिंकला तरी काही फायदा होणार नाही.कारण तसे करून भारताला सेमी फायनल गिफ्ट दिल्यासारखं होईल. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्यासाठी काय करावं लागेल? हे जाणून घेऊयात.
India vs Pakistan
India vs Pakistan
advertisement

खंर तर पहिल्यांदा टीम इंडियाच्या डावाबद्दल जाणून घेऊयात. पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती. टीम इंडियाकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण दोन्ही खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. वैभव सूर्यवंशी 30 धावांवर बाद झाला.त्याच्या पाठोपाठ कर्णधार आयुश म्हात्रे शुन्यावर बाद झाला,त्यानंतर लगेचच ऑरोन जॉर्ज 16 वर बाद झाला. भारताच्या या तीनही विकेट 47वर पडल्या होत्या.

advertisement

टीम इंडियाचे हे तीन खेळाडू बाद झाल्यानंतर 18 वर्षांचा वेदांत त्रिवेदी मैदानात आला, यावेळी त्याच्यासोबत विहान मल्होत्रा मैदानात होता. यावेळ वेदांतने संयमीपणे मैदानात टीचून खेळायला सूरूवात केली.या दरम्यान दुसऱ्या बाजूने भारताच्या विकेट पडतच होत्या. विहान मल्होत्रा 21 तर अभिग्यान कुंडू 16 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर वेदांत त्रिवेदीने एकट्याने पाकिस्तानशी भिडून 68 धावांची खेळी केली. जिकडे सगळेच खळाडू फेल ठरत होते तिकडे वेदांतने अर्धशतकीय खेळी केली.या खेळीच्या बळावर भारत 200 च्या आसपास पोहोचला होता.

advertisement

त्यानंतर शेवटच्या क्षणी आर अम्बरीशने 29, खिलान पटेलने 21 धावा आणि कनिश्क चौहाने 35 धावांची खेळी केली.या खेळीच्या बळावर भारत 252 धावांवर ऑल आऊट झाली होती.पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने प्रत्येकी 3,मोहम्मद सय्यामने 2 आणि अली राजा,अहमद हुसने, मोमीन कमार आणि अली हसन बलोचने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

सेमी फायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला काय करावं लागणार?

advertisement

भारताने पाकिस्तानसमोर 253 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य पाकिस्तानला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सांभाळ फूड व्यवसाय, मित्र-मैत्रिणीची जोडी ठरतेय हिट, कमाई तर पाहाच
सर्व पहा

50 ओव्हर ऐवजी 33.3 ओव्हरमध्ये गाठायचे आहे. जर पाकिस्तानने हे लक्ष्य इतक्या बॉलमध्ये गाठले तरच त्यांना सेमी फानयल गाठता येणार आहे. जर 33 हून अधिक ओव्हरमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला तरी त्यांना सेमी फायनल गाठता येणार नाही आहे.त्यात पाकिस्तानने युथ वनडेमध्ये आतापर्यंत एकदाही 33 ओव्हरमध्ये 200 हून अधिक धावा केल्या नाहीयेत.त्यामुळे पाकिस्तानसमोर हे मोठं आव्हान असणार आहे. जर पाकिस्ताने 33.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठू शकली नाही तर भारत सेमी फायनलमध्ये पोहोचणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : मॅचचा निकाल काही लागो! पाकिस्तानच्या सेमी फायनलच्या चाव्या भारताच्या हातात,कसं आहे समीकरण?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल