TRENDING:

Success Story : नोकरी सांभाळत सुरू केला फूड व्यवसाय, मित्र-मैत्रिणीची जोडी ठरतेय हिट, कमाई तर पाहाच

Last Updated:

स्ट्रीट रसोई या नावाने त्यांनी सुरू केलेला हा छोटासा स्ट्रीट फूड व्यवसाय सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे.

advertisement
मुंबई: नोकरीसोबत छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवणारे तरुण आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहेत. जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात राहणाऱ्या यश आणि तन्वी या मित्र-मैत्रिणींनी असाच एक यशस्वी पार्ट टाइम फूड बिझनेस सुरू केला आहे. स्ट्रीट रसोई या नावाने त्यांनी सुरू केलेला हा छोटासा स्ट्रीट फूड व्यवसाय सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे.
advertisement

यश हा पेशाने इंजिनिअर असून सध्या तो वर्क फ्रॉम होम करतो. तर तन्वी ही शिक्षिका आहे. शाळेपासूनची मैत्री, एकत्र कॉलेज आणि सतत संपर्कात असलेल्या या दोघांमध्ये आपण काहीतरी स्वतःचं करायला हवं अशी चर्चा होत गेली. याच चर्चेतून छोटासा पण वेगळा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि चार महिन्यांपूर्वी जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात स्ट्रीट रसोईची सुरुवात झाली.

advertisement

ऊनी शॉल्स अन् हँडमेड ज्वेलरी, पुण्यात काश्मिरी वस्तूंचे भव्य प्रदर्शन, 100 रुपयांपासून करा खरेदी

दोघेही नोकरी करत असल्यामुळे वेळेचे योग्य नियोजन हे त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. मात्र यशचा वर्क फ्रॉम होम आणि तन्वीच्या शाळेच्या वेळा यामुळे दोघांनाही पार्ट टाइम व्यवसाय सांभाळणं शक्य झालं. पंचविशीत असलेल्या या मित्र-मैत्रिणींना अनेकदा फिरायला जाता येत नाही, मित्रांसोबत वेळ घालवता येत नाही, पण या गोष्टी मनाला न लावता त्यांनी आपलं लक्ष व्यवसायावर केंद्रित केलं आहे.

advertisement

स्ट्रीट रसोईची खासियत म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ. चायनीज भेळ असो किंवा इतर स्नॅक्स, यामध्ये कोणतेही रेडीमेड सॉसेस वापरले जात नाहीत. सगळ्या चटण्या आणि सॉसेस घरच्या घरी तयार केल्या जातात. कोणतेही आर्टिफिशियल रंग वापरले जात नाहीत, त्यामुळे खाणं चविष्ट तर आहेच, पण सुरक्षितही आहे. मोमोजचे विविध प्रकारही येथे मिळतात. सहसा बाहेर 60 ते 70 रुपयांना मिळणारे मोमोज येथे केवळ 39 रुपयांना उपलब्ध आहेत.

advertisement

त्यामुळे शाळकरी मुले, कॉलेजचे विद्यार्थी आणि आसपासचे रहिवासी यांच्यासाठी स्ट्रीट रसोई हा परवडणारा आणि आवडता स्नॅक्सचा पर्याय ठरत आहे. पार्ट टाइम असूनही या व्यवसायातून यश आणि तन्वीला सध्या महिन्याला सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचा नफा मिळत आहे. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही एकत्र करता येतात, फक्त इच्छाशक्ती आणि नियोजन हवं, असं हे दोघे सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी सांभाळत सुरू केला फूड व्यवसाय, मित्र-मैत्रिणीची जोडी ठरतेय हिट, कमाई तर पाहाच
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल