TRENDING:

Unseasonal rains : अखेर 'तो' परतला, ऐन थंडीत जोरदार बॅटिंग; नागरिकांची उडाली तारांबळ

Last Updated:
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
advertisement
1/5
अखेर 'तो' परतला, ऐन थंडीत जोरदार बॅटिंग; नागरिकांची उडाली तारांबळ
ऐन थंडीच्या दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
advertisement
2/5
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याचे आज पाहायला मिळालं. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
advertisement
3/5
अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळालं. ऐन थंडीच्या दिवसांत पावसामुळे वेगळंच चित्र निर्माण झालं आहे.
advertisement
4/5
निसर्गाच्या लहरीपणामुळे मानवी आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
5/5
दरम्यान, सोमवारी रात्री कोल्हापूरला अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक सरीवर सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ऐन थंडीत राज्यात हवामान खात्याने तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला होता. (बायलाईन - हरिश दिमोटे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Unseasonal rains : अखेर 'तो' परतला, ऐन थंडीत जोरदार बॅटिंग; नागरिकांची उडाली तारांबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल