TRENDING:

Bike एकदा करा टँक फुल, बायकोला घेऊन थेट महाबळेश्वरला जाऊन या! किंमत फक्त 55 हजारांपासून

Last Updated:
ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ऑफिस, दुकानावर जाण्यासाठी जास्त मायलेजची बाईक खरेदीकडे कल दिला जातो. यामध्ये कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक म्हणून टीव्हीएस मोटर्सटी TVS Radeon ही एक बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
1/8
Bike एकदा करा टँक फुल, बायकोला घेऊन थेट महाबळेश्वरला जाऊन या! किंमत फक्त 55 हजार
एकीकडे वाढती महागाई आणि इंधनाच्या दरामुळे सर्वसामन्यांचं कंबरडं मोडलं आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्ये एकीकडे बाईक आणि कारच्या किंमती कमी जरी झाल्या असल्या तरी वाहनं खरेदी करणाऱ्यांमध्ये आता गरजेप्रमाणे निवड करण्याचा समजसपणा आला आहे. त्यामुळे मायलेज, सेफ्टी किती याचा विचार पहिला केला जाात आहे.
advertisement
2/8
अशातच ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ऑफिस, दुकानावर जाण्यासाठी जास्त मायलेजची बाईक खरेदीकडे कल दिला जातो. यामध्ये कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक म्हणून टीव्हीएस मोटर्सटी TVS Radeon ही एक बेस्ट ऑप्शन आहे. कारण, याबाइकची किंमत फक्त ५५ हजार रुपयांपासून सुरू होते.
advertisement
3/8
TVS Radeon बद्दल बोलायचं झालं तर या बाइकमध्ये १०७ सीसीचं इंजिन आहे. हे एक  Duralife इंजिन आहे, यामध्ये  'इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन' टेक्नॉलॉजी दिली आहे, म्हणजे, इंजिनला जितकं पेट्रोल लागेल तितकंच पुरवलं जातं.
advertisement
4/8
ज्यामुळे मायलेजमध्ये फरक जाणवतो. ही बाईक  ८.०८ bhp पॉवर आणि ८.७ Nm टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये ४-स्पीड गिअरबॉक्स दिले आहे.  या बाइकचा टॉप स्पीड हा  ९० किमी इतका आहे.
advertisement
5/8
मायलेज किती देते?  TVS Radeon ही एक १०० सीसी सेगमेंटमधली बाईक आहे, त्यामुळे  मायलेज हे तब्बल ७३.६८ किमी प्रति लिटर इतकं देते, असा दावा कंपनीने केला आहे. शहरी भागात चालवली तर जवळपास एका लिटरमध्ये ६२ ते ७० किमी इतकं मायलेज मिळतं.
advertisement
6/8
विशेष म्हणजे, एकदा का जर टाकी फुल्ल केली तर ही बाइक ७०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकते. त्यामुळे ऑफिस, दुकान, तालुक्याच्या ठिकाणी जाणं येण्यासााठी ही एक बेस्ट बाईक आहे. 
advertisement
7/8
फिचर्स काय आहे?  TVS Radeon मध्ये काही खास फिचर्स दिले आहे.  रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर, LED DRLs, मोठी आणि आरामदायी सीट, USB चार्जिंग पॉईंट आणि सेमी-डिजिटल कन्सोल दिले आाहे, हेच फिचर्स तुम्हाला १२५ सीसी सेगमेंटमधील बाईकमध्ये मिळतात.
advertisement
8/8
  या बाइकमध्ये १३० मिमी ड्रम ब्रेक दिले आहे तर टॉप व्हेरिएंटमध्ये २४० मिमी फ्रंट डिस्क ब्रेकचा ऑप्शन दिला जातो तर मागील चाकासाठी ११० मिमी ड्रम ब्रेक दिले आहे. तसंच, या बाइकमध्ये १८ इंचाचे अलॉय व्हील्स आणि सुरक्षिततेसाठी कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS)  दिली आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bike एकदा करा टँक फुल, बायकोला घेऊन थेट महाबळेश्वरला जाऊन या! किंमत फक्त 55 हजारांपासून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल