TRENDING:

15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य, 50 हजार मागितले अन्..., ठाण्यात संतापजनक प्रकार

Last Updated:

Thane News: प्रथमेश देसाई असे आरोपीचे नाव असून या प्रकरणात मुलीच्या पालकांनी 1 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: ठाण्यात 15 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करून बदनामीची भीती दाखवत 50 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी लोकमान्य नगर परिसरातील 23 वर्षीय तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश देसाई असे आरोपीचे नाव असून या प्रकरणात मुलीच्या पालकांनी 1 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती.
Thane News: 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य, 50 हजार मागितले अन्..., ठाण्यात संतापजनक प्रकार
Thane News: 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य, 50 हजार मागितले अन्..., ठाण्यात संतापजनक प्रकार
advertisement

प्रथमेश देसाई याने गेल्या 6 महिन्यांपासून विविध ठिकाणी नेत विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याबाबत 1 मार्च रोजी तिच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती. वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी देसाई याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, देसाईने सप्टेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या काळात विद्यार्थिनीचा विनयभंग केला.

Pune News: मायभूमी युद्धाने होरपळली, पुण्यात इराणी विद्यार्थ्यांसमोर नवं संकट, पोलीसही आले पुढे!

advertisement

विद्यार्थिनीला त्यांच्या संबंधाबाबत आईवडिलांना सांगण्याची धमकी देत तिच्याकडून 50 हजार रुपये उकळले. सतत धमक्या आणि आर्थिक मागण्या सहन न झाल्याने, मुलीने अखेर तिच्या पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी पोलिसांत धाव घेतली, असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

दरम्यान, देसाईवर भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य, 50 हजार मागितले अन्..., ठाण्यात संतापजनक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल