NZ vs SA : पहिल्या सेमी फायनलला शॉकींग ट्विस्ट, 77 वर निम्मा संघ तंबूत, 6 फुट 8 इंचाचा खेळाडू एकटा नडला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ज्यावेळेस आफ्रिकेचे 5 विकेट पडले होते त्यावेळेस त्यांचा डाव 100-120च्या आसपास ऑलआऊट होईल असे वाटत होते. पण त्याचवेळी सेमी फायनलमध्ये मोठा ट्विस्ट आला.
advertisement
1/8

टी20 वर्ल्डकपमध्ये आज पहिला सेमी फायनलचा सामना हा साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सूरू आहे. हा सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे.
advertisement
2/8
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साऊथ आफ्रिकेची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण क्विंटन डिकॉक 10 तर एडन मार्करम 18 धावांवर बाद झाला होता.
advertisement
3/8
मार्करम पाठोपाठ रायन रिकल्टन शुन्यावर बाद झाला.त्यानंतर डेविल मिलर 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेवाल्ड ब्राविसने 34 धावांची खेळी केली होती.
advertisement
4/8
डेवाल्ड ब्राविस जेव्हा बाद झाला होता तेव्हा साऊथ आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता.कारण 10.2 ओव्हरमध्ये त्यांचे 77 वर 5 विकेट पडल्या होत्या.
advertisement
5/8
ज्यावेळेस आफ्रिकेचे 5 विकेट पडले होते त्यावेळेस त्यांचा डाव 100-120च्या आसपास ऑलआऊट होईल असे वाटत होते. पण त्याचवेळी सेमी फायनलमध्ये मोठा ट्विस्ट आला.
advertisement
6/8
त्याचं झालं असं की ट्रिस्टन स्टब्स आणि मार्को जान्सने आफ्रिकेचा डाव सावरला आणि तीन ओव्हरमध्ये (16,17,18 ओव्हरला)भयंकर धावा काढल्या.
advertisement
7/8
आफ्रिकेने 19 व्या ओव्हरला 13, 18 व्या ओव्हरला 22 आणि 17 व्या ओव्हरला 15 धावा म्हणजेच तीन ओव्हरला 50 धावा आल्या. या खेळीमध्ये मार्का यान्सनने 30 बॉलमध्ये 55 धावांची नाबाद खेळी केली होती.
advertisement
8/8
मार्का यान्सनच्या या वादळी खेळीमुळे साऊथ आफ्रिकेने 169 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे न्यूझीलंडसमोर 170 धावांचे लक्ष्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
NZ vs SA : पहिल्या सेमी फायनलला शॉकींग ट्विस्ट, 77 वर निम्मा संघ तंबूत, 6 फुट 8 इंचाचा खेळाडू एकटा नडला