advertisement

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसने मध्येच थांबवलं, राखी मोठ्याने किंचाळली; कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेतसोबत भयंकर घडलं?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्याच्या कॅप्टनशिपसाठी संकेत आणि रुचिता आमनेसामने आले आहेत. दोघांनाही घराचा पुढचा कॅप्टन बनायचं असल्याने टास्कमध्ये जोरदार चुरस रंगलेली दिसते.

News18
News18
Bigg Boss Marathi 6 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळणार आहे. नुकत्याच रिलीज  झालेल्या प्रोमोमध्ये वायरिंगच्या गुंत्यात अडकलेला टास्क आणि त्यातून निर्माण झालेला धक्कादायक प्रसंग पाहायला मिळतो. 'थांबा, सगळ्यांनी त्वरित थांबा,' असा आदेश देत बिग बॉसना हस्तक्षेप करावा लागतो आणि घरातील वातावरण क्षणात तणावपूर्ण होतं.
या आठवड्याच्या कॅप्टनशिपसाठी संकेत आणि रुचिता आमनेसामने आले आहेत. दोघांनाही घराचा पुढचा कॅप्टन बनायचं असल्याने टास्कमध्ये जोरदार चुरस रंगलेली दिसते. टास्कमध्ये विविध वायरचा गुंता सोडवण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. मात्र खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते.
advertisement
प्रोमोमध्ये रुचिता दीपाली ताईंना सांगताना दिसते, "दीपाली ताई, त्याला खेच, खेच." दुसरीकडे संकेत सगळ्या वायर घट्ट पकडून उभा राहतो आणि ठामपणे म्हणतो, "मी कोणालाही जाऊ देणार नाही." पण या झटापटीत सगळ्या वायर त्याच्या मानेभोवती फिरतात. काही क्षणांतच हा खेळ धोकादायक वळण घेतो.
संकेतच्या गळ्याभोवती वायर घट्ट झाल्याचं पाहून घरच्यांची धडधड वाढते. राखी मोठ्याने ओरडताना ऐकू येते, "बिग बॉस, त्याच्या गळ्यात रस्सी आहे." सागरही घाबरून "थांबा, थांबा" असं ओरडताना दिसतो. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच बिग बॉस लगेचच आदेश देतात, "सगळ्यांनी त्वरित थांबा."
advertisement
advertisement
हा कॅप्टन्सी टास्क इतका शॉकिंग होईल याची कल्पनाही घरच्यांना नसावी. खेळ जिंकण्याच्या नादात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसतं. बिग बॉसच्या हस्तक्षेपानंतर टास्क थांबवण्यात येतो का? संकेत सुरक्षित आहे ना? आणि या घटनेचा कॅप्टनशिपच्या निकालावर काय परिणाम होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
वायरिंगच्या गुंत्यात अडकलेला हा टास्क आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं काय घडलं आणि पुढे काय निर्णय घेतला जाणार हे येत्या भागात स्पष्ट होणार आहे. मात्र या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसने मध्येच थांबवलं, राखी मोठ्याने किंचाळली; कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेतसोबत भयंकर घडलं?
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement