advertisement

Numerology: मोबाईल नंबरच्या शेवटचे अंक प्रगतीच्या मार्गातील काटे? जन्मतारखेनुसार लकी कनेक्शन पाहा

Last Updated:
Numerology Marathi: अनेकांना कदाचित माहिती नसेल मोबाईल नंबरसुद्धा आपल्या प्रगतीशी किंवा अडचणींशी संबंधित असू शकतो. ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण अंकशास्त्राचे जाणकार मानतात की प्रत्येक नंबरची स्वतःची एक ऊर्जा असते. ही ऊर्जा तुमच्या जन्मतिथीशी जुळत नाही, तेव्हा आयुष्यात छोट्या-छोट्या अडचणी वाढू शकतात. मोबाईल फक्त कॉल करण्याचं साधन राहिलेला नसून तो आपली ओळख, काम आणि बँकिंगचा महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणूनच अंकशास्त्रात मोबाईल नंबरला खूप महत्त्व दिलं जातं.
1/8
कित्येक लोक नावातले बदल किंवा गाडीच्या नंबरसाठी अंकशास्त्राची मदत घेतात. याचं कारण म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक अंकाला एका ग्रहाशी जोडलं जातं: 1 सूर्य, 2 चंद्र, 3 बृहस्पती (गुरू), 4 राहू, 5 बुध, 6 शुक्र, 7 केतु, 8 शनी आणि 9 मंगळ. मोबाईल नंबर आपण दिवसभर वापरतो, त्यामुळे त्याचा एकूण योग जर तुमच्या जन्मांकाशी जुळला, तर आयुष्यात स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो असं मानलं जातं.
कित्येक लोक नावातले बदल किंवा गाडीच्या नंबरसाठी अंकशास्त्राची मदत घेतात. याचं कारण म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक अंकाला एका ग्रहाशी जोडलं जातं: 1 सूर्य, 2 चंद्र, 3 बृहस्पती (गुरू), 4 राहू, 5 बुध, 6 शुक्र, 7 केतु, 8 शनी आणि 9 मंगळ. मोबाईल नंबर आपण दिवसभर वापरतो, त्यामुळे त्याचा एकूण योग जर तुमच्या जन्मांकाशी जुळला, तर आयुष्यात स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो असं मानलं जातं.
advertisement
2/8
मोबाईल नंबरचा अंक काढण्याची सोपी पद्धत - तुमच्या मोबाईल नंबरमधील सर्व 10 अंकांची बेरीज करा आणि जोपर्यंत एक आकडा येत नाही, तोपर्यंत ती बेरीज करत राहा.उदाहरण: 9+8+7+6+5+4+3+2+1+0 = 45 → 4+5 = 9 म्हणजे या नंबरचा मुख्य अंक 9 मानला जाईल.
मोबाईल नंबरचा अंक काढण्याची सोपी पद्धत - तुमच्या मोबाईल नंबरमधील सर्व 10 अंकांची बेरीज करा आणि जोपर्यंत एक आकडा येत नाही, तोपर्यंत ती बेरीज करत राहा.उदाहरण: 9+8+7+6+5+4+3+2+1+0 = 45 → 4+5 = 9म्हणजे या नंबरचा मुख्य अंक 9 मानला जाईल.
advertisement
3/8
1. जन्मांक 1 (ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 तारखेला झाला आहे)या लोकांसाठी 2, 3, 4 किंवा 9 योग असलेले नंबर शुभ मानले जातात. हे अंक त्यांच्यातील नेतृत्वाची क्षमता वाढवण्यास मदत करतात. 2. जन्मांक 2 (ज्यांचा जन्म 2, 11, 20, 29 तारखेला झाला आहे) यांच्यासाठी 1 आणि 5 योग असलेले नंबर चांगले मानले जातात. संवेदनशील स्वभावाच्या या लोकांसाठी हे अंक आत्मविश्वास वाढवणारे ठरतात.
1. जन्मांक 1 (ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 तारखेला झाला आहे)या लोकांसाठी 2, 3, 4 किंवा 9 योग असलेले नंबर शुभ मानले जातात. हे अंक त्यांच्यातील नेतृत्वाची क्षमता वाढवण्यास मदत करतात.2. जन्मांक 2 (ज्यांचा जन्म 2, 11, 20, 29 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 1 आणि 5 योग असलेले नंबर चांगले मानले जातात. संवेदनशील स्वभावाच्या या लोकांसाठी हे अंक आत्मविश्वास वाढवणारे ठरतात.
advertisement
4/8
3. जन्मांक 3 (ज्यांचा जन्म 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 1, 2 किंवा 9 योग असलेले नंबर उत्तम मानले जातात. संवाद आणि प्रगतीसाठी हे अंक पूरक ठरतात. 4. जन्मांक 4 (ज्यांचा जन्म 4, 13, 22, 31 तारखेला झाला आहे) यांच्यासाठी 5, 6 किंवा 8 योग असलेले नंबर फायदेशीर ठरतात. व्यावहारिक विचार आणि स्थिरतेसाठी हे कॉम्बिनेशन सुचवलं जातं.
3. जन्मांक 3 (ज्यांचा जन्म 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 1, 2 किंवा 9 योग असलेले नंबर उत्तम मानले जातात. संवाद आणि प्रगतीसाठी हे अंक पूरक ठरतात.4. जन्मांक 4 (ज्यांचा जन्म 4, 13, 22, 31 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 5, 6 किंवा 8 योग असलेले नंबर फायदेशीर ठरतात. व्यावहारिक विचार आणि स्थिरतेसाठी हे कॉम्बिनेशन सुचवलं जातं.
advertisement
5/8
5. जन्मांक 5 (ज्यांचा जन्म 5, 14, 23 तारखेला झाला आहे)1 किंवा 6 योग असलेले नंबर यांच्यासाठी लय भारी असतात. सामाजिक ओळख वाढवण्यासाठी हे अंक मदत करतात. 6. जन्मांक 6 (ज्यांचा जन्म 6, 15, 24 तारखेला झाला आहे) यांच्यासाठी 4, 5, 7 किंवा 8 योग असलेले नंबर समतोल राखणारे मानले जातात. नात्यांमध्ये गोडवा ठेवण्यासाठी याची मदत होते.
5. जन्मांक 5 (ज्यांचा जन्म 5, 14, 23 तारखेला झाला आहे)1 किंवा 6 योग असलेले नंबर यांच्यासाठी लय भारी असतात. सामाजिक ओळख वाढवण्यासाठी हे अंक मदत करतात.6. जन्मांक 6 (ज्यांचा जन्म 6, 15, 24 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 4, 5, 7 किंवा 8 योग असलेले नंबर समतोल राखणारे मानले जातात. नात्यांमध्ये गोडवा ठेवण्यासाठी याची मदत होते.
advertisement
6/8
7. जन्मांक 7 (ज्यांचा जन्म 7, 16, 25 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 6 किंवा 9 योग असलेले नंबर सकारात्मक मानले जातात. अध्यात्म आणि अंतर्ज्ञानासाठी हे अंक चांगले आहेत. 8. जन्मांक 8 (ज्यांचा जन्म 8, 17, 26 तारखेला झाला आहे) यांच्यासाठी 4, 5 किंवा 6 योग असलेले नंबर जास्त चांगले असतात. शनीच्या प्रभावाखाली असलेल्या या लोकांसाठी मानसिक शांततेसाठी हे अंक सुचवले जातात.
7. जन्मांक 7 (ज्यांचा जन्म 7, 16, 25 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 6 किंवा 9 योग असलेले नंबर सकारात्मक मानले जातात. अध्यात्म आणि अंतर्ज्ञानासाठी हे अंक चांगले आहेत.8. जन्मांक 8 (ज्यांचा जन्म 8, 17, 26 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 4, 5 किंवा 6 योग असलेले नंबर जास्त चांगले असतात. शनीच्या प्रभावाखाली असलेल्या या लोकांसाठी मानसिक शांततेसाठी हे अंक सुचवले जातात.
advertisement
7/8
9. जन्मांक 9 (ज्यांचा जन्म 9, 18, 27 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 1, 2, 3 किंवा 7 योग असलेले नंबर अनुकूल मानले जातात. हे अंक त्यांचं धाडस आणि नेतृत्व गुण वाढवतात.
9. जन्मांक 9 (ज्यांचा जन्म 9, 18, 27 तारखेला झाला आहे)यांच्यासाठी 1, 2, 3 किंवा 7 योग असलेले नंबर अनुकूल मानले जातात. हे अंक त्यांचं धाडस आणि नेतृत्व गुण वाढवतात.
advertisement
8/8
मोबाईल नंबर बदलला की नशीब बदलतं का?अंकशास्त्र सल्लागार सुद्धा मानतात की मोबाईल नंबर बदलला म्हणजे सगळं काही लगेच बदलतं असं नाही. तुमची मेहनत, कौशल्य आणि निर्णय हेच तुमच्या प्रगतीचा खरा आधार आहेत. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट शुभ मानून वापरतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. या सकारात्मक विचारांमुळे आपण आलेल्या संधींचा जास्त चांगला फायदा घेऊ शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मोबाईल नंबर बदलला की नशीब बदलतं का?अंकशास्त्र सल्लागार सुद्धा मानतात की मोबाईल नंबर बदलला म्हणजे सगळं काही लगेच बदलतं असं नाही. तुमची मेहनत, कौशल्य आणि निर्णय हेच तुमच्या प्रगतीचा खरा आधार आहेत. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट शुभ मानून वापरतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. या सकारात्मक विचारांमुळे आपण आलेल्या संधींचा जास्त चांगला फायदा घेऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement