Kitchen Hacks : घरातली भाजी चिरण्याची सूरी-कात्री बोथट झालीय? 'या' ट्रिक्स वापरा, काही मिनिटांत होईल धारदार..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to sharpen vegetable cutting knife at home आपण घरात भाज्या चिरण्यासाठी सूरी किंवा चाकू वापरत असतो. बरेच लोक पालेभाज्या कट करण्यासाठी कात्रीचा वापर करतात. मात्र कालांतराने बऱ्याच वापरानंतर हे दोन्हीही बोथट होतात, म्हणजेच कात्री आणि सुरीची धार कमी होते. यावरच एक उपाय आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
advertisement
हल्ली अनेक घरांमध्ये सिरेमिक भांडी वापरली जातात. त्यांपैकी कप किंवा प्लेट घ्या. कारण त्यांचा तळ खडबडीत असतो. हा भाग तुमची सूरी किंवा कात्रीसाठी शार्पनर म्हणून काम करतो. सिरॅमिकची प्लेट उलटी करा आणि त्याच्या खडबडीत भागावर सूरी हळूहळू घासा. घासताना त्यावर हलका दाब द्या. दोन्ही बाजूंना याचपद्धतीने घासून घ्या. 10-15 वेळा घासल्यानतंर सुरूल धार येईल.
advertisement
advertisement
advertisement
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला धारदार दगड लागेल. एक धारदार दगड घ्या आणि तो हलका ओला करा. सूरी थोडीशी तिरपी धरून ती एकाच दिशेने दगडावर घासा. सुरीच्या दोन्ही बाजूंना याच पद्धतीने धार लावून घ्या. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)








