MacBook Neo: अॅपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप लॉन्च! पाहा किती आहे किंमत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Apple Cheapest Laptop Price: अॅपलचा नवा बजेट फ्रेंडली लॅपटॉप MacBook Neo लॉन्च झालाय. यामध्ये 13 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आणि A18 Pro चिपसेट आहे. भारतात याची सुरुवातीची किंमत किती आहे आणि हा नवा मॅकबुक कोणकोणत्या मॉडल्सला टक्कर देईल. चला याविषीय सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/9

Apple ने ग्राहकांसाठी नवा बजेट फ्रंडली लॅपटॉप MacBook Neo लॉन्च केला आहे. या नव्या मॅकबुकमध्ये 13 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे आणि हा लॅपटॉप कंपनीच्या A18 Pro चिपसेटवर काम करते. याच प्रोसेसरचा वापर iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्येही करण्यात आला आहे.
advertisement
2/9
हा लॅपटॉप चार कलर ऑप्शनमध्ये उतरवण्यात आला आहे. हा लॅपटॉप मल्टीटच ट्रॅकपॅडच्या मॅजिक किबोर्ड आणि बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनसाठी टच ID सह येतो. सर्वात खास गोष्ट म्हणजे, कंपनी म्हणते की, एकदा चार्ज केल्यावर हा बजेट फ्रेंडली मॅकबुक 16 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो.
advertisement
3/9
MacBook Neo Price in India : या लॅपटॉपच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेच्या बेस व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे. 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये ठरवण्यात आली आहे. या लॅपटॉपला ब्लश, सिट्रिस, इंडिगो आणि सिल्व्हर रंगात उतरवण्यात आले आहे.
advertisement
4/9
ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, स्टूडेंट्स हे मॅकबुक 10,000 रुपयांच्या एज्युकेशन डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. मॅकबुक निओसाठी प्री-बुकिंग सुरू आहे आणि त्याची विक्री 11 मार्चपासून कंपनीच्या वेबसाइटवर आणि अधिकृत किरकोळ रिटेलर्सकडून सुरू होईल.
advertisement
5/9
स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, Apple चे हे कमी बजेटचे MacBook 60-70 हजार रुपयांच्या किमतीच्या श्रेणीतील Chromebook आणि Windows PC (HP, Dell, Acer सारख्या इतर ब्रँडचे लॅपटॉप) शी स्पर्धा करेल.
advertisement
6/9
MacBook Neo Specifications : कंपनी दावा करते की, Intel Core Ultra 5 चिपच्या Windows PC च्या तुलनेत रेग्युलर कामांमध्ये A18 प्रो चिपवर काम करणारा हा लेटेस्ट लॅपटॉप 50 टक्केपर्यंत वेगवान आहे. तर काही एआय कामांसाठी 3 टक्केपर्यंत वेगवान परफॉर्मेंस देतो. 8GB रॅमसह 256GB आणि 512GB SSD दोन स्टोरेज ऑप्शन्स मिळतात. यामध्ये जास्त रॅम लावली जाऊ शकत नाही.
advertisement
7/9
MacBook Neo मध्ये 13 इंच लिक्विड रेटिना IPS डिस्प्ले आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 219ppi आहे. यामध्ये अॅपलचा मॅजिक किबोर्ड आहे. MacBook Air प्रमाणे हा लॅपटॉपही लेटेस्ट macOS Tahoe वर काम करतो. यामध्ये 1080p FaceTime HD वेबकॅम आहे आणि यामध्ये व्हॉइस आयसोलेशन आणि वाइड स्पेक्ट्रम मायक्रोफोन मोड आहे. डॉल्बी एटमॉससह ड्यूअल स्पीकर सेटअप आणि Spatial Audio चा सपोर्टही मिळतो.
advertisement
8/9
अॅपलचा दावा आहे की हा लेटेस्ट लॅपटॉप Wi-Fi 6E आणि ब्लूटूथ व्हर्जन 6 कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त, यात एक USB 3.0 टाइप-सी पोर्ट आणि एक USB 2.0 टाइप-सी पोर्ट आहे, जे दोन्ही चार्जिंगला सपोर्ट करतात. लेफ्ट ऐजवर एक हेडफोन जॅक देखील आहे.
advertisement
9/9
या लॅपटॉपमध्ये 36.5Wh ची बॅटरी आहे जी 20W USB टाइप-C एडॉप्टरने चार्ज केली जाऊ शकते. कंपनी म्हणते की, लॅपटॉप एकदा चार्ज केल्यावर 11 तासांपर्यंत वेब ब्राउझिंग किंवा 16 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग ऑफर करु शकते. याचे वजन 1.23 किलोग्राम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
MacBook Neo: अॅपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप लॉन्च! पाहा किती आहे किंमत