TRENDING:

'मी संपलोय, हा माझा शेवटचा व्लॉग'; BIGG BOSS फेम UK07 रायडर अनुरागचा शॉकिंग VIDEO, आईवडिलांवर गंभीर आरोप

Last Updated:
BIGG BOSS fame UK07 rider Anurag Dobhal: गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या अनुरागने चक्क दोन तासांचा एक शेवटचा व्लॉग शेअर करत आपल्या आयुष्यातील अशा भयानक सत्याचा उलगडा केला आहे, जो ऐकून त्याचे लाखो चाहते सुन्न झाले आहेत.
advertisement
1/10
'मी संपलोय, हा माझा शेवटचा व्लॉग' BIGG BOSS फेम UK07 रायडर अनुरागचा शॉकिंग VIDEO
'बिग बॉस १७' फेम आणि प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल, ज्याला त्याचे फॅन्स 'UK07 रायडर' म्हणून ओळखतात, त्याच्या एका व्हिडिओने सध्या संपूर्ण इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
2/10
गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या अनुरागने चक्क दोन तासांचा एक शेवटचा व्लॉग शेअर करत आपल्या आयुष्यातील अशा भयानक सत्याचा उलगडा केला आहे, जो ऐकून त्याचे लाखो चाहते सुन्न झाले आहेत.
advertisement
3/10
"हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे, मी यूट्यूब कायमचं सोडतोय," अशी घोषणा करत अनुरागने आपल्याच कुटुंबावर मानसिक छळाचे आणि शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
4/10
व्हिडिओमध्ये अनुराग ढसाढसा रडताना दिसतोय. त्याने आपल्या मानसिक अवस्थेसाठी थेट आई-वडील, भाऊ कलम आणि बहीण श्रेयाला जबाबदार धरलं आहे.
advertisement
5/10
अनुरागच्या मते, त्याचं आंतरजातीय लग्न त्याच्या घरच्यांनी कधीच स्वीकारलं नाही. लग्नाच्या अवघ्या ६ दिवस आधी आई-वडिलांनी येण्यास नकार दिला. नातेवाईकांसमोर अनुरागला हात जोडायला लावले, पाया पडायला लावले आणि अपमानित केलं.
advertisement
6/10
"आम्हीही सुखी राहणार नाही आणि तुलाही सुखी राहू देणार नाही," असं म्हणत आई-वडिलांनी छळ केल्याचा दावा अनुरागने केला आहे. याच अपमानामुळे आणि पालकांच्या वागणुकीमुळे आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही त्याने मान्य केलं.
advertisement
7/10
अनुरागने आपला भाऊ कलम याच्यावरही अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "माझ्या भावाने मला सोशल मीडियावर 'एक्सपोज' करण्याची धमकी देऊन माझी वर्षानुवर्षांची मेहनत, प्रॉपर्टी, पैसे आणि माझे लाडके कुत्रेही हिरावून घेतले आहेत," असं त्याने सांगितलं.
advertisement
8/10
गेल्या ५ दिवसांपासून त्याने काहीही खाल्लेलं नाही आणि तो सध्या खोल नैराश्यात आहे. अनुरागची पत्नी रितिका हिनेही आता त्याची साथ सोडली आहे.
advertisement
9/10
मे २०२५ मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याने सप्टेंबर २०२५ मध्ये प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. पण आता रितिका इतरांच्या सांगण्यावरून त्याला सोडून गेल्याचं अनुरागने सांगितलं.
advertisement
10/10
व्हिडिओच्या शेवटी त्याने रितिकासाठी एक भावूक निरोप दिला, "रितिका, अनेकांनी तुला मॅनिपुलेट केलं आणि तू त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी माझ्या बाळावर खूप प्रेम केलं, तोच माझी शेवटची आशा होता. माझ्या जाण्यानंतर, किमान माझ्या आणि माझ्या बाळाच्या सन्मानासाठी तरी उभी राहा आणि खरं काय ते सांग."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी संपलोय, हा माझा शेवटचा व्लॉग'; BIGG BOSS फेम UK07 रायडर अनुरागचा शॉकिंग VIDEO, आईवडिलांवर गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल