उद्या संकष्टी चतुर्थी! उपवास ठेवत असाल तर करू नका चूक, 'हा' एक पदार्थ खाणं टाळाच
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उद्या फाल्गुन महिन्यातील 'संकष्टी चतुर्थी' साजरी केली जाणार आहे. गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र असून, अनेकजण या दिवशी मनोभावे उपवास धरतात. संकष्टीचा उपवास हा केवळ श्रद्धेचा भाग नसून तो शिस्तीचाही भाग आहे.
advertisement
1/7

उद्या फाल्गुन महिन्यातील 'संकष्टी चतुर्थी' साजरी केली जाणार आहे. गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र असून, अनेकजण या दिवशी मनोभावे उपवास धरतात. संकष्टीचा उपवास हा केवळ श्रद्धेचा भाग नसून तो शिस्तीचाही भाग आहे. शास्त्रानुसार, उपवास करताना आपण काय खातो यापेक्षा काय टाळतो, याला अधिक महत्त्व आहे.
advertisement
2/7
जर तुम्ही उद्याचा उपवास करणार असाल, तर बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी आणि व्रताचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. विशेषतः या 6 गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.
advertisement
3/7
कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य: अनेकदा आपण उपवास करतो आणि कळत न कळत आपण उपवास सोडताना असे काही पदार्थ खातो ज्यामुळे दिवसभराच्या उपवासाचे फळ वाया जाते. उपवासाच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये चुकूनही कांदा आणि लसूण वापरू नका. अनेकजण साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याची भाजी करताना चवीसाठी हे पदार्थ वापरतात, परंतु शास्त्रांनुसार कांदा-लसूण हे 'तामसिक' अन्न मानले जाते. उपवासाच्या दिवशी सात्त्विक आहार घेणेच बंधनकारक आहे.
advertisement
4/7
मांसाहार पूर्णपणे टाळा: चतुर्थीच्या दिवशी चुकूनही घरामध्ये मांसाहार करू नये. केवळ उपवास करण्याऱ्यानेच नव्हे तर घरातील इतर सदस्यांनीही या दिवशी मांसाहार टाळावा. या पवित्र दिवशी घरामध्ये सात्त्विकता राखल्यास बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहतो.
advertisement
5/7
मद्यपानापासून दूर राहा: उपवासाच्या दिवशी मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे हे महापाप मानले जाते. व्यसनाधीन अवस्थेत केलेली पूजा बाप्पा स्वीकारत नाही. मन आणि शरीर शुद्ध ठेवूनच संकष्टीचे व्रत पूर्ण करावे, अन्यथा आरोग्यावर आणि भाग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
advertisement
6/7
कोणाचेही 'उष्टे' खाऊ नका: उपवास करताना शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे या दिवशी कोणाचेही उष्टे अन्न खाऊ नका. तसेच स्वतः अन्न ग्रहण करण्यापूर्वी ते बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवावे. उष्टे अन्न खाल्ल्याने व्रताची शुद्धता नष्ट होते आणि दोषाचा सामना करावा लागतो.
advertisement
7/7
अन्न वाया घालवू नका: उपवासाच्या दिवशी फलाहार करताना किंवा रात्री जेवताना ताटात अन्न उरवू नका. अन्नाचा अपमान करणे म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे. जेवढे आवश्यक आहे तेवढेच ताटात घ्यावे. गरिबांना किंवा गरजूला दान करणे या दिवशी अधिक पुण्यदायी ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्या संकष्टी चतुर्थी! उपवास ठेवत असाल तर करू नका चूक, 'हा' एक पदार्थ खाणं टाळाच