Palghar Fire: धुराचे लोट अन् विद्यार्थ्यांची किंकाळी! डहाणूतील वसतिगृहाच्या आगीचा थरार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
डहाणू येथील या आश्रमशाळेच्या वसतिगृहात दुपारी अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले.
advertisement
1/7

पालघर जिल्ह्यातील डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या एका शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहाला आज भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.
advertisement
2/7
या आगीत विद्यार्थ्यांचे कपडे, अंथरुण-पांघरूण आणि शैक्षणिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, आग लागल्याचे वेळेत लक्षात आल्याने वसतिगृहातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू येथील या आश्रमशाळेच्या वसतिगृहात दुपारी अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. ज्यावेळी आग लागली त्यावेळी वसतिगृहात 200 हून अधिक विद्यार्थी वास्तव्यास होते.
advertisement
4/7
आग लागल्याचे समजताच एकच खळबळ उडाली आणि विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
5/7
आगीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले असून, डोळ्यांदेखत आपले साहित्य जळताना पाहून मुलांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
advertisement
6/7
आगीची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत स्थानिकांनी पाण्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.
advertisement
7/7
सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमधील विद्युत यंत्रणेचे ऑडिट वेळेवर होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Palghar Fire: धुराचे लोट अन् विद्यार्थ्यांची किंकाळी! डहाणूतील वसतिगृहाच्या आगीचा थरार