Weather Alert: काळजी घ्या! रविवारी ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा, पुण्यात 24 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: रविवारी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला देखील यलो अलर्ट असून हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्रात येवू लागल्याने गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पारा घसरला आहे. पहाटे दाट धुके पसरत असून आजही हुडहुडी कायम आहे. पुणे ते सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा 16 नोव्हेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
आज 16 नोव्हेंबर रोजी जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेडसह पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीची लाट असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला असून तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांपेक्षा अधिक घट होणार असल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/7
साताऱ्यात गारठा वाढत असून धुक्यासह दव पडत आहेत. शनिवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 30.3 अंशावर राहिला. तर 12 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 12 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
4/7
कोल्हापूरमध्ये देखील गारठा वाढत आहे. किमान तापमान 15 अशांच्या खाली आले असून कमार तापमान देखील 30 अशांवरून घसरले आहे. सकाळी दाट धुक्यासह थंडी हुडहुडी भरत असून नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात शनिवारी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान 15.4 अंशावर राहिले. आज कमाल तापमान 32 अंशांवरच राहणार असले तरी किमान तापमानाचा पारा 14 अंशापर्यंत घसरेल. जिल्ह्यातील जेऊरला सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 14.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 29 अंशावर राहील. तसेच किमान तापमान 15 अंशावर राहील. सांगलीत पहाटे थंडीचा कडाका आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पारा घसरला असून हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या असून शहरात स्वेटर, कानटोप्या, उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: काळजी घ्या! रविवारी ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा, पुण्यात 24 तासांसाठी अलर्ट