TRENDING:

T20 World Cup : सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला, सूर्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतला मोठा चान्स!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल होत आहे.
advertisement
1/9
सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला, सूर्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा चान्स!
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलचा सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात विजय मिळवणारी टीम टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
2/9
त्याआधी बुधवारी झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या सेमी फायनलमधली विजेती टीम 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळेल.
advertisement
3/9
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 5 मॅच झाल्या आहेत, यातल्या 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा आणि 2 सामन्यात इंग्लंडचा विजय झाला आहे. लागोपाठ तिसऱ्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत-इंग्लंड लढत होत आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा आणि दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे.
advertisement
4/9
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सेमी फायनलमध्ये टॉस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, कारण याआधी 2016 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या तिन्ही नॉक आऊट सामन्यांमध्ये टॉस जिंकणारी टीम मॅच जिंकली होती.
advertisement
5/9
2014 पासून झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या नॉकआऊटच्या नाईट मॅचमध्ये ज्या टीमने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, त्याच टीमचा विजय झाला आहे.
advertisement
6/9
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पहिले बॉलिंग करून आम्ही आव्हानाचा पाठलाग करू, असं हॅरी ब्रुक म्हणाला आहे. रियान अहमदऐवजी ओव्हरटन प्लेइंग इलेव्हनमध्ये आल्याचं ब्रुकने सांगितलं आहे.
advertisement
7/9
टॉस जिंकलो असतो तर आम्हीही पहिले बॅटिंग घेतली असती, कारण सेमी फायनलचा दबाव असताना आव्हानाचा पाठलाग करणं कठीण जाऊ शकतं, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
8/9
या सामन्यात टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. अभिषेक शर्मा हा संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला आहे, तसंच त्याची फिल्डिंगही खराब झाली आहे, त्यामुळे सेमी फायनलमध्ये अभिषेकला डच्चू देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण तरीही कॅप्टन सूर्याने अभिषेक शर्मावर विश्वास ठेवला आहे.
advertisement
9/9
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला, सूर्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतला मोठा चान्स!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल