Squats : दररोज स्कॉट्स मारले तर काय होईल? शरीरासाठी 7 जबरदस्त फायदे; 30 दिवसांत दिसेल फरक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उठा-बशा काढण्याचा हा प्रकार दिसायला साधा असला तरी, याचे परिणाम अत्यंत शक्तिशाली आहेत. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत फक्त काही मिनिटं स्क्वॉट्सला दिली, तर तुमच्या शरीरात काय बदल होतात? चला, या 'सुपर' व्यायामाचे फायदे आणि ते करण्याची योग्य पद्धत सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/11

सकाळची गडबड, ऑफिसचं काम आणि घरच्या जबाबदाऱ्या यांत स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं सध्याच्या काळात मोठं आव्हान बनलं आहे. अनेकजण फिटनेससाठी महागड्या जिमचं सबस्क्रिप्शन घेतात, पण वेळेअभावी तिथे जाणं होत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? कोणतंही उपकरण न वापरता, घरातल्या एका कोपऱ्यात उभं राहून तुम्ही असा व्यायाम करू शकता जो तुमच्या संपूर्ण शरीराचा कायापालट करू शकतो.
advertisement
2/11
आपण बोलतोय 'स्क्वॉट्स' (Squats) बद्दल. उठक-बैठक काढण्याचा हा प्रकार दिसायला साधा असला तरी, याचे परिणाम अत्यंत शक्तिशाली आहेत. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत फक्त काही मिनिटं स्क्वॉट्सला दिली, तर तुमच्या शरीरात काय बदल होतात? चला, या 'सुपर' व्यायामाचे फायदे आणि ते करण्याची योग्य पद्धत सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/11
1. पोटाचा घेर कमी होतो (Strong Core):अनेकांना वाटतं स्क्वॉट्स फक्त पायांसाठी आहेत, पण तसं नाही. स्क्वॉट्स करताना पाठीचा कणा स्थिर ठेवण्यासाठी पोटाच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे तुमचे 'कोअर' स्नायू मजबूत होतात आणि शरीराचा पोश्चर (Posture) सुधारतो.
advertisement
4/11
2. हाडांचे आरोग्य सुधारते:वाढत्या वयानुसार हाडांची घनता (Bone Density) कमी होऊ लागते. स्क्वॉट्ससारखे वेट-बेअरिंग व्यायाम हाडांना मजबूती देतात, ज्यामुळे भविष्यात ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो.
advertisement
5/11
3. चयापचय क्रिया (Metabolism) वेगवान होते:स्क्वॉट्समध्ये शरीरातील सर्वात मोठे स्नायू गट सहभागी असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीज जाळल्या जातात आणि तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतो, जो वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
advertisement
6/11
4. लवचिकता आणि हालचाल सुलभ होते:रोज स्क्वॉट्स केल्याने तुमचे नितंब (Hips), गुडघे आणि घोट्याचे सांधे लवचिक होतात. यामुळे पायऱ्या चढणे किंवा खाली वाकून वस्तू उचलणे यांसारख्या दैनंदिन हालचाली सोप्या होतात.
advertisement
7/11
रिझल्ट मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्सनुसते स्क्वॉट्स मारण्यापेक्षा ते 'योग्य' पद्धतीने मारणे महत्त्वाचे आहे. अधिक चांगल्या निकालासाठी या टिप्स लक्षात ठेवा:योग्य पद्धत (Form): तुमचे पाय खांद्यांच्या रेषेत असावेत. खाली बसताना पाठ सरळ ठेवा, छाती पुढच्या बाजूला आणि गुडघे पायाच्या अंगठ्याच्या पुढे जाणार नाहीत याची काळजी घ्या.विविध प्रकार करून पहा: रोज तेच स्क्वॉट्स करून कंटाळा येत असेल, तर 'सुमो स्क्वॉट्स', 'जंप स्क्वॉट्स' किंवा 'गोब्लेट स्क्वॉट्स' करून स्नायूंना नवीन चॅलेंज द्या.हळूहळू वजन वाढवा: सुरुवातीला फक्त शरीराच्या वजनाने स्क्वॉट्स करा, नंतर हातात डंबेल किंवा पाण्याचा बाटला घेऊन तीव्रता वाढवा.सातत्य महत्त्वाचे: स्क्वॉट्सचे परिणाम दिसण्यासाठी किमान 30 दिवस सलग सराव करणे आवश्यक आहे.
advertisement
8/11
स्क्वॉट्स सुरक्षित असले तरी, एकाच दिवशी शेकडो स्क्वॉट्स मारून स्वतःला थकवू नका. शरीराला रिकव्हरीसाठी वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला गुडघेदुखी किंवा पाठीचा त्रास असेल, तर हा व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement
9/11
सकाळची गडबड, ऑफिसचं काम आणि घरच्या जबाबदाऱ्या यांत स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं सध्याच्या काळात मोठं आव्हान बनलं आहे. अनेकजण फिटनेससाठी महागड्या जिमचं सबस्क्रिप्शन घेतात, पण वेळेअभावी तिथे जाणं होत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? कोणतंही उपकरण न वापरता, घरातल्या एका कोपऱ्यात उभं राहून तुम्ही असा व्यायाम करू शकता जो तुमच्या संपूर्ण शरीराचा कायापालट करू शकतो.
advertisement
10/11
स्क्वॉट्स हा केवळ पायांचा व्यायाम नसून संपूर्ण आरोग्याचा पाया आहे. आजपासूनच रोज किमान 15-20 स्क्वॉट्सने सुरुवात करा आणि स्वतःमधील बदल अनुभवा
advertisement
11/11
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Squats : दररोज स्कॉट्स मारले तर काय होईल? शरीरासाठी 7 जबरदस्त फायदे; 30 दिवसांत दिसेल फरक