T20 World Cup : धोनीचा फॉर्म्युला गंभीरने कॉपी-पेस्ट केला... पुन्हा वानखेडे अन् तोच निर्णय, हिस्ट्री रिपीट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
advertisement
1/7

सेमी फायनलमध्ये पहिले बॅटिंगला आल्यानंतर टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. 7 बॉलमध्ये 9 रन करून अभिषेक आऊट झाला, पण संजू सॅमसन आणि इशान किशन इंग्लंडच्या बॉलिंगवर तुटून पडले.
advertisement
2/7
संजू सॅमसनने 26 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. तर इशान किशनने 18 बॉलमध्ये 216.67 च्या स्ट्राईक रेटने 39 रन केले, ज्यात 4 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्येच टीम इंडियाने 67 रन केल्या, तर 9वी ओव्हर संपली तेव्हा भारताचा स्कोअर तब्बल 112 रन झाला होता.
advertisement
3/7
10व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला लेग स्पिनर आदिल रशीदने इशान किशनची विकेट घेतली. आणखी एक मोठा फटका मारण्याच्या नादात इशान आऊट झाला. इशानची विकेट गेल्यानंतर डावखुरा बॅटर शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला.
advertisement
4/7
टीम इंडियाकडून चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव बॅटिंगला येतो, पण संजू सॅमसन उजव्या हाताने बॅटिंग करतो त्यामुळे डावखुरा बॅटर शिवम दुबेला बॅटिंगमध्ये प्रमोशन मिळालं. याआधी 2011 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही टीम इंडियाने हीच रणनीती अवलंबली होती.
advertisement
5/7
2011 ला वानखेडे स्टेडियमवरच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये डावखुरा गौतम गंभीर खेळत होता, तेव्हा डावखुऱ्या युवराज सिंगला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याऐवजी कर्णधार एमएस धोनी स्वत: आला आणि त्याने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
advertisement
6/7
2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एमएस धोनीने 79 बॉलमध्ये नाबाद 91 रन केले होते, तर गौतम गंभीरने 97 रनची मॅच विनिंग खेळी केली होती. धोनी आणि गंभीरच्या या खेळीमुळे टीम इंडियाने 28 वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता.
advertisement
7/7
2011 साली कर्णधार धोनीने वानखेडे स्टेडियमवर वापरलेली स्ट्रॅटेजी आता टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा वापरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : धोनीचा फॉर्म्युला गंभीरने कॉपी-पेस्ट केला... पुन्हा वानखेडे अन् तोच निर्णय, हिस्ट्री रिपीट!