TRENDING:

संजूसाठी खाकी वर्दी सोडली, शहरही बदललं, भारताच्या नव्या हिरोला घडवणाऱ्या बाप माणसाचा संघर्ष!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनने वेस्ट इंडिजनंतर इंग्लंडविरुद्ध वादळी खेळी केली. वानखेडे स्टेडियमवरच्या सेमी फायनलमध्ये संजूने खणखणीत अर्धशतक झळकावलं.
advertisement
1/8
संजूसाठी खाकी वर्दी सोडली, भारताच्या नव्या हिरोला घडवणाऱ्या बाप माणसाचा संघर्ष!
इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये संजूने 42 बॉलमध्ये 211.90 च्या स्ट्राईक रेटने 89 रन केले, ज्यात 8 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. संजूच्या या तुफानी खेळीमुळे पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 253 रन केले.
advertisement
2/8
याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यातही संजूने अर्धशतक केलं होतं. संजूने वेस्ट इंग्लंडविरुद्ध 50 बॉलमध्ये 12 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद 97 रन केले. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला भारतीय खेळाडूचा हा सर्वोत्तम स्कोअर ठरला.
advertisement
3/8
मागची बरीच वर्ष टीम इंडियाचे दरवाजे ठोठावणाऱ्या संजू सॅमसनला त्याचं टीममधलं स्थान पक्कं करण्यात येत नव्हतं, पण या दोन खेळींमुळे त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे.
advertisement
4/8
देशाकडून क्रिकेट खेळण्यासाठी फक्त संजूच नाही, तर त्याच्या वडिलांनाही बराच संघर्ष करावा लागला आहे. संजूचं बालपण हे उत्तर दिल्लीतल्या जीटीबी नगर पोलीस कॉलनीमध्ये गेलं. संजूचे वडील सॅमसन विश्वनाथन फूटबॉल खेळाडू होते, ते संतोष ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळले.
advertisement
5/8
संजूचे वडील दिल्लीमध्ये पोलीस कॉन्सटेबल होते. ज्युनिअर स्पर्धेमध्ये संजूने 8 मॅचमझ्ये 500 पेक्षा जास्त रन केल्या, पण तरीही त्याची अंडर-13 टीममध्ये निवड झाली नाही, त्यामुळे संजू घरी रडत आला.
advertisement
6/8
एके दिवशी संजूचा सराव पाहण्यासाठी त्याचे वडील गेले, तेव्हा मुलाला श्रीलंकेच्या टीममध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहात का? असा खोचक प्रश्न बाजूने जाणाऱ्या व्यक्तीने संजूच्या वडिलांना विचारला.
advertisement
7/8
मुलाचा दिल्लीच्या रणजी टीममध्ये प्रवेश होणं सोपं नाही, हे संजूच्या वडिलांच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच व्हीआरएस घेतली आणि ते संजूला घेऊन तिरुवनंतपुरमला गेले.
advertisement
8/8
संजूने तिरुवनंतपुरममध्ये नव्याने क्रिकेट खेळायला सुरूवात केली आणि इथूनच त्याच्या प्रवासाला सुरूवात झाली. संजू पुढे अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळला, त्यानंतर त्याने आयपीएलमध्येही यश मिळवलं, त्यामुळे त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
संजूसाठी खाकी वर्दी सोडली, शहरही बदललं, भारताच्या नव्या हिरोला घडवणाऱ्या बाप माणसाचा संघर्ष!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल