TRENDING:

IND vs ENG : हार्टबीट वाढली, श्वास रोखला; वानखेडेवर भारतच बॉस, इंग्लंडचे पॅकअप, टीम इंडिया फायनलमध्ये!

Last Updated:
8 मार्चला 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलची लढत होणार आहे.
advertisement
1/6
हार्टबीट वाढली, श्वास रोखला; वानखेडेवर भारतच बॉस, इंग्लंडचे पॅकअप, टीम इंडिया फा
वानखेडेच्या मैदानावर टी20 वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला आहे.त्यामुळे या विजयासह टीम इंडिया फायनलला पोहोचली आहे.
advertisement
2/6
टीम इंडियाने इंग्लंडसमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सूरूवात खराब झाली होती. कारण इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट स्वस्तात बाद झाला होता.त्यानंतर कॅप्टन हॅरी ब्रुक मैदानात आला होता. पण तो देखील 7 धावांवर बाद झाला होता.
advertisement
3/6
सुरूवातीचे दोन विकेट पडल्यानंतर जॉस बटलर आणि जेकॉब बेथेलने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण या दरम्यान बटलर 25 वर बाद झाला. त्यानंतर टॉम बॅन्टन 17 वर बाद झाला.
advertisement
4/6
इंग्लंडचे एका मागून एक विकेट पडत असताना जॅकॉब बेथेलने डाव सावरला होता. त्याच्या जोडीला विल जॅक्स देखील मैदानात होता. पण तो 20 बॉलमध्ये 35 धावा करून बाद झाला होता.
advertisement
5/6
इंग्लंडला शेवटच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. यावेळी इंग्लंडकडून एकाकी झूंज देणारा जेकॉब बेथल रनआऊट झाला होता. त्याने सर्वाधिक 48 बॉलमध्ये 105 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 7 षटकार आणि 8 चौकार लगावले होते. या विकेटनंतरच अख्खी मॅच फिरली. कारण इंग्लंड फक्त 246 धावांपर्यंतच मजल मारली होती.त्यामुळे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला होता.
advertisement
6/6
दरम्यान भारताने हा सामना जिंकल्याने ते फायनला पोहोचले होते. तर बुधवारी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंड फायनलला पोहोचली होती. त्यामुळे आता 8 मार्चला 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलची लढत होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : हार्टबीट वाढली, श्वास रोखला; वानखेडेवर भारतच बॉस, इंग्लंडचे पॅकअप, टीम इंडिया फायनलमध्ये!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल