IND vs ENG : 6.30 ला पहिली, 7.09 ला दुसरी चूक; इंग्लंडने हातातली मॅच कशी गमावली; त्या दोन चूका कोणालाच कळल्या नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हा हायस्कोरींग सामना इंग्लंड हमखास जिंकू शकली असती. पण इंग्लंड संघाकडून मैदानात घडलेल्या त्या दोन चुका त्यांना महागात पडल्या होत्या. या दोन चूका कुणालाच कळल्या नव्हत्या.
advertisement
1/9

टी20 वर्ल्ड कपमध्ये वानखेडेवर रंगलेल्या अटीतटीच्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने अवघ्या 7 धावांनी इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने फायनलमध्ये एंन्ट्री मारली आहे.
advertisement
2/9
खरं तर भारताने दिलेल्या 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड फक्त 246 धावांपर्यंतच मजल मारू शकली होती.त्यामुळे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला होता.
advertisement
3/9
इंग्लंडकरून जेकॉब बेथेलने 48 बॉलमध्ये 105 धावांची वादळी खेळी करून टीम इंडियाच्या पोटात गोळा आणला होता. पण शेवटच्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाल्याने भारताच्या पारड्याच मॅच आली होती.
advertisement
4/9
दरम्यान हा हायस्कोरींग सामना इंग्लंड हमखास जिंकू शकली असती. पण इंग्लंड संघाकडून मैदानात घडलेल्या त्या दोन चुका त्यांना महागात पडल्या होत्या. या दोन चूका कुणालाच कळल्या नव्हत्या.
advertisement
5/9
इंग्लंडच्या पहिल्या चुकीबद्दल बोलायचं झालं तर कॅप्टन हॅरी ब्रुकने टॉस जिंकला होता.त्यामुळे तो हमखास बॅटींग घेऊ शकला असता. कारण ड्यु फॅक्टर पण नव्हता आणि हायव्होल्टेज सामन्यात कोणत्याही टीमला धावांचा पाठलाग करणे खूप अवघड जाते. ही हॅरी ब्रुकची मेजर चूक होती. ही घटना टॉस दरम्यान म्हणजेट 6.30 ला घडली होती.
advertisement
6/9
इंग्लंडकडून दुसरी सर्वात मोठी चुक ठरली ती म्हणजे तिसऱ्या ओव्हरला संजू सॅमसनची कॅच ड्रॉप झाली. विशेष म्हणजे ही कॅच कॅप्टन हॅऱी ब्रुकनेच ड्रॉप केली होती.त्यावेळी संजू 15 धावांवर खेळत होता.पण हे जीवनदान मिळाल्यानंतर त्याने पुढे जाऊन 42 बॉलमध्ये 89 धावांची खेळी होती. त्यामुळे हॅरी ब्रुकच्या एका चुकीमुळे जवळ जवळ 70 अतिरीक्त धावा गेल्या. विशेष म्हणजे ही घटना 7.09 ला घडली होती.
advertisement
7/9
विशेष म्हणजे इंग्लंडच्या या पराभवानंतर हॅरी ब्रुकने आपली चूक मान्य केली होती.“मी माझे हात वर करून कबूल करतो की संजू सॅमसनची कॅच ड्रॉप करून मी मोठी चूक केली, असे त्याने कबुल केले.
advertisement
8/9
त्यामुळे इंग्लंडच्या हातून घडलेल्या या दोन मोठ्या चुका त्यांच फायनलच स्वप्न भंग करून गेल्या.
advertisement
9/9
दरम्यान भारताने हा सामना जिंकल्याने ते फायनला पोहोचले होते. तर बुधवारी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंड फायनलला पोहोचली होती. त्यामुळे आता 8 मार्चला 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलची लढत होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : 6.30 ला पहिली, 7.09 ला दुसरी चूक; इंग्लंडने हातातली मॅच कशी गमावली; त्या दोन चूका कोणालाच कळल्या नाही