TRENDING:

T20 World Cup : सूर्याचा खतरनाक माईंड गेम, हॅरी ब्रुक बघतच राहिला, त्या 2 निर्णयांमुळे टीम इंडिया फायनलला!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने घेतलेल्या दोन निर्णयांमुळे मॅचचं चित्रच बदलून गेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे. भारताने दिलेलं 254 रनचं आव्हान पार करायला आलेल्या इंग्लंडनेही टीम इंडियाच्या बॉलिंगवर जोरदार आक्रमण केलं. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या जेकब बेथलने किल्ला लढवला. बेथलने 48 बॉलमध्ये 105 रनची झुंजार खेळी केली, ज्यात 8 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. बेथलशिवाय विल जॅक्सने 20 बॉल 35 रनची खेळी केली, पण इंग्लंडच्या इतर खेळाडूंनी त्याला साथ दिली नाही.
सूर्याचा खतरनाक माईंड गेम, हॅरी ब्रुक बघतच राहिला, त्या 2 निर्णयांमुळे टीम इंडिया फायनलला!
सूर्याचा खतरनाक माईंड गेम, हॅरी ब्रुक बघतच राहिला, त्या 2 निर्णयांमुळे टीम इंडिया फायनलला!
advertisement

जेकब बेथलने टीम इंडियाच्या सगळ्याच बॉलरवर हल्ला चढवला. टी-20 क्रिकेट क्रमवारीमध्ये नंबर वन बॉलर असलेल्या वरुण चक्रवर्तीने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 64 रन दिल्या तर अर्शदीप सिंगच्या 4 ओव्हरमध्ये 51 रन आल्या. अक्षर पटेलनेही त्याच्या 3 ओव्हरमध्ये 35 रन खर्च केले.

सूर्याने खेळला मास्टरस्ट्रोक

जेकब बेथल मैदानात होता तेव्हा इंग्लंड या सामन्यात चमत्कार करू शकते, असं वाटत होतं, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने मास्टरस्ट्रोक खेळला. इंग्लंडला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 69 रनची गरज होती, तेव्हा सूर्याने बुमराहच्या हातात बॉल दिला. कॅप्टनचा हा निर्णय बुमराहने योग्य ठरवला आणि त्याने या ओव्हरमध्ये फक्त 6 रन दिले, ज्यामुळे मॅच इंग्लंडच्या हातातून बाहेर गेली.

advertisement

दुबेला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग

त्याआधी टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना संजू क्रीजवर होता तेव्हा सूर्या स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला नाही, त्याऐवजी त्याने शिवम दुबेला पाठवलं. संजू सॅमसन हा उजव्या हाताने बॅटिंग करतो तर शिवम दुबे डावखुरा आहे, त्यामुळे इंग्लंडच्या बॉलर्सची लाईन ऍण्ड लेन्थ खराब करण्यासाठी सूर्याने हा निर्णय घेतला. शिवम दुबेने 25 बॉलमध्ये 172 च्या स्ट्राईक रेटने 43 रनची वादळी खेळी केली, ज्यात 4 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचं मार्केट हाललं, लिंबू अन् शेवग्यालाही भाव, कुठं मिळाला सर्वाधिक दर?
सर्व पहा

कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यामध्ये खेळलेल्या या दोन मास्टरस्ट्रोकमुळे टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. रविवार 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची फायनल होईल.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सूर्याचा खतरनाक माईंड गेम, हॅरी ब्रुक बघतच राहिला, त्या 2 निर्णयांमुळे टीम इंडिया फायनलला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल